राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन

सोलापूर : सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते व माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.

शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील हुतात्मा शॉपिंग सेंटर येथे शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय सुरू केले आहे. त्याचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी पार पडला. यावेळी बोलताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आगामी महापालिकेच्या अनुषंगाने स्थानिक परिस्थिती पाहून आघाडीचा निर्णय घेणार असून, आघाडी बाबत आपला पक्ष सकारात्मक असल्याचे सांगितले.


२०१२ मध्ये महापालिकेच्या निवडणुकीत याच कार्यालयाच्या माध्यमातून कामकाज करताना 17 नगरसेवक निवडून आणले होते. या लकी असलेल्या कार्यालयातून म भविष्यात महानगरपालिका निवडणुकीत १७ पेक्षा जास्त निवडून आणण्याचा मानस शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी व्यक्त केला.

यावेळी भारत जाधव, शंकर पाटील, यु एन बेरिया, गोविंदराज एकबोटे, राजा शेख, चंद्रकांत पवार, दिनेश शिंदे, सुनिता रोटे, जावेद खरेदी, बिस्मिल्ला शिकलगर, अजित पात्रे, मोहम्मद इडिकर, मोनिका सरकार, सीया मुलानी, मनीषा माने, गौरा कोरे, प्रतीक्षा चव्हाण, सिद्धारूढ निंबाळे, जनार्दन बोराडे, प्रविण इराकशेट्टी, डॉ दादाराव रोटे, संपन्न दिवाकर, प्रशांत गायकवाड, सरफराज शेख, राजू कुरेशी, अक्षय जाधव, अमित मोतीवार, मुसा आत्तार, बिराप्पा बंडगर, लखन गावडे, संजय जाबा, विजय भोईटे, मिलिंद गोरे, अक्षय बचुटे, सिद्धार्थ सर्वगोड आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.