सोलापूर – शहरातील दुसऱ्या दिवसाच्या सायंकाळच्या सत्रात राष्ट्रवादीचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांनी शास्त्रीनगर भागात झंजावाती दौरा केला. या भागातील अल्पसंख्यांक समाजाकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची गर्दी पाहून अण्णा बनसोडे भारावून गेले. शास्त्रीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी एमआयएम पक्षावर तोफ डागली.
सोलापुरात जिल्हाध्यक्ष संतोष पवार आणि आपण स्वतः ३६५ दिवस आणि २४ तास अहोरात्र राष्ट्रवादी पक्षाची ध्येय धोरणे सोलापूर शहरातील घरोघरी पोहोचविण्याचे काम गेल्या अनेक वर्ष करत आलो आहोत.यामुळेच आज राज्यात अजितदादा पवार यांच्यामुळे हसन मुश्रीफ आणि इद्रिस नाईकवाडी या मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नेत्यांना आमदारकी व मंत्रिपद मिळाले आहेत. सोलापुरातील मुस्लिम समाजाला भरकटवण्याचे काम एमआयएमकडून होत असले तरी जातीवादी पक्षाला सोलापुरात आतापर्यंत मुस्लिम समाज बांधवांनी कधीच थारा दिलेला नाही. एमआयएमचे नेते आठवडाभरातून एकदा सोलापुरात येतात, एका कोपऱ्यात बैठका घेतात आणि निघून जातात. बैठकीतून नेमके काय निष्पन्न होते ? याचे गौडबंगाल अद्याप कळून आलेले नाही.सोलापूर शहरातील एमआयएम पक्षामध्ये मोठेपणावरून अंतर्गत प्रचंड वाद आहेत. त्यामुळे समोर हजारोच्या संख्येने असलेला अल्पसंख्यांक समाज हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार यांच्या पाठीशी कायमच उभा राहिला आहे.
आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाच्या चिंधड्या उडतील, हे आठवडाभरात सोलापूरकरांना समजणार असल्याचे सांगत जातीवादी एमआयएम पक्षाबरोबर जाण्यापेक्षा राष्ट्रवादी अजितदादा पक्षाबरोबर जाणे किती तर पटीने चांगले असल्याचे आज मुस्लिम समाजातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कळून चुकले आहे. त्यामुळे संतोष पवार आणि जुबेर बागवान ही राम- रहीमची जोडी सोलापूरकर आहे. मातृभूमीची सेवा करण्याची त्यांना ओढ आहे. त्यामुळे सहा दिवस मुंबईमध्ये मुंबईमध्ये आणि एक दिवस सोलापुरात येऊन पक्षाचे काम पाहणाऱ्यांना सोलापूरकर कधीच स्वीकारणार नाहीत,असे सांगत सोलापूर महापालिका निवडणुकीत अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी सुसाट निघालेली दिसेल, असे कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी जाहीर सभेत ठणकावून सांगितले.
अल्पसंख्यांकांच्या पाठबळावर अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी महानगरपालिकेचे मैदान मारणार असे सहसंपर्क प्रमुख अण्णा बनसोडे म्हणाले.
इब्राहिम कुरेशी आणि शकील शेख यांनी शास्त्री नगरात प्रभाग क्रमांक १७, १८ आणि १९ कार्यकर्ता बैठक आणि जाहीर सभेचे आयोजन केले होते.
यावेळी पूजा धोत्रे यांचा पक्ष प्रवेश सर्वांचे लक्ष वेधून गेला. याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार,कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान महिला आघाडी कार्याध्यक्ष चित्रा कदम,माजी नगरसेविका नूतन गायकवाड, ज्येष्ठ नागरिक संघाचे शहराध्यक्ष भारतराव साबळे जेष्ठ जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले,प्रदेश सचिव विशाल बंगाळे सलीम पामा मोहसीन डिके महेबुब कादरी शकील शेख सद्दाम रंगरेज बुलंद कुरेशी वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेहराज आबादीराजे, श्यामराव गांगर्डे, शहर सचिव दत्तात्रय बनसोडे सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष अनिल बनसोडे प्रा. बोळकोटे, संजीवनी गायकवाड
उपस्थित होते…

