राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व धर्माला सोबत घेऊन जाणारा पक्ष : अण्णा बनसोडे !

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व धर्माला सोबत घेऊन जाणारा पक्ष : अण्णा बनसोडे !

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व धर्मीयांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. त्यामुळेच आज राज्यभरात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांना सर्वधर्मीय लोक लाखोंच्या संख्येने जोडले गेले आहेत, असे गौरवोद्ग विधानसभेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांनी काढले.


गुरुवारी सायंकाळी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी प्रभाग क्रमांक १४ येथील विजापूर वेस येथे चौकाच्या सुशोभीकरणाचा भूमिपूजन समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता.यावेळी सहसंपर्क प्रमुख अण्णा बनसोडे यांच्या हस्ते चौकाच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी बोलताना सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणत्याही प्रकारचा जातिभेद केला जात नसल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी सोलापूर महानगरपालिकेत सर्व धर्मीयांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. विजापूर वेस हा जरी मुस्लिम बहुल भाग असला तरी या भागात सुद्धा सर्व जाती धर्माच्या लोकांचा राबता आहे. याच प्रमुख चौकातून सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या नंदीध्वजाची मिरवणूक जाते.याच ठिकाणी मुस्लिम बांधवांच्यावतीने दरवर्षी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या नंदीध्वज व पालखीवर पुष्पवृष्टी करून सामाजिक सलोख्याचे दर्शन घडविले जाते . विजापूर वेस चौकाचे सुशोभिकरण झाल्यानंतर हा चौक खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा नावारूपाला येण्यास मदत होणार असल्याचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी सांगितले.


यावेळी सोलापूर शहर – जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर- जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, जेष्ठ नेते सुधीर खरटमल, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव,आनंद चंदनशिवे, राष्ट्रवादीचे नेते तौफीक शेख,प्रदेश सरचिटणीस आनंद मुस्तारे,सचिव इरफान शेख,महिला आघाडी अध्यक्षा संगीता जोगधनकर,चित्रा कदम, माजी नगरसेविका नूतन गायकवाड, नजीब शेख, माजी नगरसेवक गणेश पुजारी, सुहास कदम, अमीर शेख यांची उपस्थिती होती.