राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संविधानिक तत्वावर चालणारा पक्ष :- प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संविधानिक तत्वावर चालणारा पक्ष :- प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे

सोलापूर – संविधान दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

देशाच्या लोकशाही व्यवस्थेला दृढ करण्यासाठी डॉ. आंबेडकर यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचे स्मरण करत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्याला सलाम केला.

पक्षाच्या नेतृत्वाने सांगितले की, डॉ. आंबेडकर यांनी रचलेल्या संविधानाने सामाजिक समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्याय या मूलभूत मूल्यांना बळ दिले. समाजाच्या सर्व घटकांना समान हक्क देणारे संविधान हा भारताच्या विकासाचा भक्कम पाया आहे, असेही मत व्यक्त करण्यात आले. राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानिक तत्वावर चालणारा पक्ष आहे . असे सतत सांगत असतात त्यामुळे दादांच्या विचारा प्रमाणे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी नेते , आजी माजी नगरसेवक , कार्यकर्ते चालतो ,लोकशाही बळकट करण्यासाठी संविधानातील मूल्यांचे रक्षण करणे हीच डॉ. आंबेडकरांना खरी आदरांजली असल्याचे आनंद चंदनशिवे म्हणाले.

संविधान दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती उपक्रम आणि संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान, प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी च्या वतीने शहराध्यक्ष संगीता जोगधनकर यांच्या संचलनाखाली वाचन केले.

या प्रसंगी शहर – जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, प्रदेश सरचिटणीस शशिकांत बापू कांबळे , माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, माजी नगरसेवक गणेश पुजारी , महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर, फारूक मटके ,भरत साबळे , जेष्ठ नेते मारुती जाधव माजी नगरसेविका नूतन गायकवाड, वहिदाबी शेख , जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, युन्नस शेख , अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अमीर शेख, सेवादल विभाग अध्यक्ष प्रकाश जाधव,श्यामराव गांगर्डे , नाट्य व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष आशुतोष नाटकर, VJNT सेल विभाग अध्यक्ष रुपेशकुमार भोसले, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष अनिल बनसोडे , वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी , मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेहराज आबादीराजे, दक्षिण विधानसभा कार्याध्यक्ष प्रदीप भालशंकर,शहर सचिव दत्तात्रय बनसोडे,उत्तर विधानसभा कार्याध्यक्ष प्रकाश झाडबुके ,अहमद शेख , ॲड जयप्रकाश भंडारे, प्रज्ञासागर गायकवाड, सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे, सद्दाम रंगरेज, अर्चना दुलंगे, निशांत तारानाईक, ॲड. शाईन शेख , उमेदवी झाडबुके , बंटी यमपुरे , रोहित माने , रेणुका सुतार, मीरा घटकांबळे,सीमा जेऊरकर,नागनाथ वाघमारे , सचिन अलकुंटे, सतिष शिंगे – कुमठे, श्रीमंत जाधव VD गायकवाड दीपक पांडगळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…