नागेश गायकवाड आणि किसन जाधव,राम – लक्ष्मणाची जोडी ! सर्वधर्मियांच्या विकासकामाची राष्ट्रवादीची हिच खरी रणनीती !

नागेश गायकवाड आणि किसन जाधव,राम – लक्ष्मणाची जोडी ! सर्वधर्मियांच्या विकासकामाची राष्ट्रवादीची हिच खरी रणनीती !

सोलापूर – माजी नगरसेवक नागेश गायकवाड आणि किसन जाधव ही खऱ्या अर्थाने राम – लक्ष्मणाची जोडी असून या दोघांच्या माध्यमातून या भागातील सर्वधर्मियांच्या विकासकामाची राष्ट्रवादीची हिच खरी रणनीती असल्याचे गौरवोदगार विधानसभेचे उपाध्यक्ष आणि अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूरचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांनी काढले.
शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास रामवाडीत विधानसभेचे उपाध्यक्ष तथा सह संपर्कप्रमुख अण्णा बनसोडे यांच्या शुभहस्ते १ कोटींच्या सांस्कृतिक भवन प्रकल्पाचा मोठ्या थाटात शुभारंभ
करण्यात आला, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे बोलत होते.


अण्णा बनसोडे म्हणाले, किसन जाधव आणि नागेश गायकवाड तसेच या परिवारातील युवा नेतृत्व म्हणून पुढे येत असलेले चेतन गायकवाड आदी मंडळींकडून राष्ट्रवादी पक्षावर कायमच निष्ठा ठेवून काम करण्यात येते . राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा शब्द,जाधव आणि गायकवाड बंधूकडून प्रमाण मानला जातो. अजित दादांच्या निष्ठेपोटी रामवाडी परिसरातील विविध विकास कामांसाठी कोटयवधी रुपयांचा निधी मिळाला असून जाधव आणि गायकवाड यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा जातिभेद न करता सर्वधर्मीयांच्या विकास कामाला प्राधान्य देण्यात येत असल्याचेही अण्णा बनसोडे यांनी सांगितले.


प्रस्ताविक भाषणात राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव म्हणाले, रामवाडी परिसरासाठी विकासाचा नवा अध्याय सुरू झाला असून उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार यांच्या विशेष निधीतून तब्बल १ कोटी रुपयांच्या दोन महत्त्वाकांक्षी सांस्कृतिक प्रकल्पांची उभारणी होत आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन या दोन भव्य योजनांचा शुभारंभ व भूमिपूजन सोहळा आज पार पडला असून लवकरच या कामाचे लोकार्पण करण्याचा मानस आहे.


दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनासाठी ५० लाख, तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनासाठी ५० लाख अशी भक्कम आर्थिक तरतूद करून रामवाडी परिसराला कायमस्वरूपी सांस्कृतिक दिशा देण्याचा मानसही किसन जाधव यांनी व्यक्त केला .


रामवाडी येथील अंबाबाई मंदिराच्या पाठीमागे, प्रभाग क्र. २२ येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी नगरसेवक किसन जाधव, नागेश गायकवाड, तसेच चेतन गायकवाड आदी मंडळींकडून अण्णा बनसोडे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान लक्ष्मण { काका } जाधव प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे ,प्रदेश सरचिटणीस शशिकांत बापू कांबळे माजी नगरसेवक नागेश (आण्णा) गायकवाड,इरफान शेख माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे महिला आघाडी कार्याध्यक्ष चित्रा कदम माजी नगरसेविक पूनम गायकवाड जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख , श्यामराव गांगर्डे प्रदेश सचिव विशाल बंगाळे,ज्येष्ठ नागरिक संघाचे शहराध्यक्ष भारत साबळे, युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड शहर सचिव दत्तात्रय बनसोडे सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे राजेश्री कांबळे संघटक सचिन चलवादी फिरोज शेख संजीवनी गायकवाड मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेहराज आबादीराजे , दक्षिण विधानसभा श्रीकांत वाघमारे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…
आदी उपस्थित होते.