नगरपंचायत निवडणुक रणनीती;‎ प्रदेशाध्यक्ष‎ सुनील‎ तटकरे यांची किसन‎ जाधवांनी‎ घेतली भेट

नगरपंचायत निवडणुक रणनीती;‎ प्रदेशाध्यक्ष‎ सुनील‎ तटकरे यांची किसन‎ जाधवांनी‎ घेतली भेट

सोलापुर – राष्ट्रवादी‎ काँग्रेस‎ पक्ष‎ (अजित पवार )‎ चे प्रदेशाध्यक्ष‎ सुनील‎ तटकरे‎ आणि महिला प्रदेशाध्यक्ष तसेच महिला‎ आयोगाच्या‎ अध्यक्षा‎ रूपाली‎ चाकणकर नगरपंचायत‎ निवडणुकीच्या‎ पार्श्वभूमीवर कुर्डूवाडीत प्रचारसभेसाठी दाखल झाले. या‎ वेळी पक्षाचे‎ प्रदेश उपाध्यक्ष किसन‎ जाधव‎ यांनी‎ दोन्ही मान्यवरांचे स्वागत केले‎ नगरपंचायतीत‎ राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक‎ निवडून यावेत, यासाठी हा दौरा‎ आयोजित करण्यात‎ आला‎ होता. यावेळी पक्षाच्या ग्रामीण‎ व‎ शहरी संघटनांना बळकट करण्यावर भर‎ देण्यात‎ आला. सोलापूर‎ महानगरपालिका‎ निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाचा निर्णय घेत‎ प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी माहिती‎ दिली‎ की, सोलापूर जिल्ह्याचे‎ सहसंपर्क‎ मंत्री‎ व विधानसभेचे‎ उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांचा‎ 27 ते 29‎ नोव्हेंबरदरम्यान‎ सोलापूर शहर‎ दौरा‎ निश्चित‎ करण्यात आला‎ आहे. या‎ कालावधीत‎ शहर जिल्हाध्यक्ष,‎ शहर‎ कार्यकारिणी,‎ प्रदेश पदाधिकारी‎ आणि कार्यकर्त्यांसोबत‎ बैठका‎ घेऊन महापालिकेत‎ अधिकाधिक नगरसेवक निवडून‎ आणण्याची‎ रणनीती‎ अंतिम‎ केली जाणार आहे.
या दौऱ्याचे‎ काटेकोर नियोजन‎ करण्याच्या सूचना‎ सुनील तटकरे‎ यांनी‎ किसन‎ जाधव‎ यांना देत,‎ पक्ष संघटन मजबूत करण्याला‎ गती‎ मिळाली‎ आहे. याप्रसंगी करमाळ्याचे माजी आमदार‎ संजय‎ मामा‎ शिंदे,‎ ग्रामीण‎ जिल्हाध्यक्ष‎ उमेश‎ पाटील, सोलापूर‎ शहर राष्ट्रवादी‎ सरचिटणीस संतोष‎ उर्फ ऋतिक‎ गायकवाड, कुर्डूवाडी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष‎ दत्ता काकडे, पवन‎ बेरे आदींची‎ उपस्थिती‎ होती.