१५ वर्षाखालील मुलींच्या आंतरराज्य सराव स्पर्धेत पहिल्या सामन्यात मुंबईचा निसटता विजय

सोलापूर : येथील प्रसिद्ध इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर आजपासून महाराष्ट्र, मुंबई व बडोदा या तीन राज्याच्या १५ वर्षाखालील मुलींच्या एक दिवसीय (३५ षटके)सामन्यांच्या स्पर्धेला सुरुवात झाली व सलामीच्या सामन्यात मुंबई संघ महाराष्ट्र विरुद्ध चार धावांनी विजयी झाला.

सकाळी १० वाजता सुरू झालेल्या सामन्यात महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत मुंबई संघाला फलंदाजी पाचारण केले.


मुंबई संघाने 35 षटकात 5 बाद 221 धावसंख्या उभारली ती सलामीवीर वेदिका निकम व रिया ठाकूर चे अर्धशतकाच्या जोरावर.


सामन्याच्या दुसऱ्या शतकात स्वामिनी बेलेकर ने श्रुतिका पाटील हिला बात करत झटका दिला परंतु नंतर वेदिका निकम (57 धावा 53 चेंडू 11 चौकार) हिने रिया ठाकूर (81 धावा 76 चेंडू 10 चौकार) सोबत 89 धावांची भागीदारी रचली.
वेदिका बाद झाल्यावर सोनाक्षी सोळंकी (21) उन्नती पाटील (28) सारथी भाकरे (18) यांनी धावसंख्येला हातभार लावला.
महाराष्ट्र कडून अनुष्का राठोड हिने 2 व मधुश्री उपळावीकर, स्वामिनी बेलेकर यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला.

विजयासाठी 222 धावांचे लक्ष गाठताना निर्धारित 35 षटकात महाराष्ट्राचा संघ 6 बाद 217 धावाच करू शकला व शेवटच्या शतकापर्यंत रोमहर्षक ठरलेल्या या सामन्यात मुंबई संघ केवळ चार धावांनी विजयी झाला. महाराष्ट्राकडून सलामीवीर गायत्री हांडे (43) तसेच सोनल शिंदे (61) स्वामिनी बेलेकर (51) धावा केल्या परंतु ह्या तिघी बाद झाल्यानंतर इतर फलंदाज लक्ष्य गाठू शकले नाहीत.
मुंबई कडून गंगना मुलाकाला हिने 3 व सारथी भाकरे, काव्या भागवत यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. सामन्यासाठी पंच म्हणून नवीन माने व अतिक शेख यांनी काम पाहिले. उद्या मुंबई विरुद्ध बडोदा असा सामना होणार असल्याचे जिल्हा क्रिकेट संघटनेच्या वतीने कळविण्यात आले.
महाराष्ट्र संघा चा खेळ पाहून पुढील महिन्यात बीसीसीआयच्या स्पर्धेसाठी संघ निवडीकरिता निवड समिती प्रमुख ऋचा शिंदे व सदस्य हजर असून प्रमुख प्रशिक्षक सचिन नायर व इतर सहाय्यक स्टाफ यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्राच्या मुली सामन्यात प्रदर्शन करत आहेत.