सोलापुरातील मानाचा श्री. कसबा गणपतीच्या दर्शनाने सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे कृतज्ञ !

सोलापुरातील मानाचा श्री. कसबा गणपतीच्या दर्शनाने सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे कृतज्ञ !

सोलापूर – आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसाच्या सोलापूर दौऱ्यावर आलेले विधानसभेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांच्या हस्ते गुरुवारी रात्री बाळीवेस येथील मानाचा श्री कसबा गणपतीची आरती करण्यात आली. कसबा गणपतीचे मनोभावे दर्शन घेतल्यानंतर अण्णा बनसोडे कृतज्ञ झाले

राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव आनंद मुस्तारे यांनी रात्री हा धार्मिक योग जुळवून आणला. गणेशाच्या आरतीनंतर अण्णा बनसोडे यांनी आनंद मुस्तारे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.


यावेळी सोलापूर शहर – जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर- जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, जेष्ठ नेते सुधीर खरटमल, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव,आनंद चंदनशिवे, प्रदेश सरचिटणीस आनंद मुस्तारे, महिला आघाडी अध्यक्षा संगीता जोगधनकर,चित्रा कदम, माजी नगरसेविका नूतन गायकवाड, माजी नगरसेवक गणेश पुजारी, सुहास कदम, प्रमोद भोसले यांच्यासह सोमनाथ भोगडे, सोमनाथ मेंगाने, संजय दर्गोपाटील,केदार मेंगाणे,प्रकाश वाले, शिवशंकर कोरडे,शिवानंद बुगडे, शिवानंद कोळकुर, राजशेखर विजापुरे,शशिकांत बिराजदार,प्रकाश वाले, आप्पासाहेब बिराजदार, सोमनाथ गद्रे, राहुल बोळकोटे, भास्कर आडकी, गणेश चिंचोळी यांची उपस्थिती होती.