वंचितची शहरात बैठक, अकोला पॅटर्न सोलापुरात राबवण्याचा ठराव

वंचितची शहरात बैठक, अकोला पॅटर्न सोलापुरात राबवण्याचा ठराव

सोलापूर – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक गुरुवारी पार पडली. शहरातील राजकीय परिस्थिती, संघटनात्मक तयारी आणि निवडणूक धोरण यावर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

या बैठकीचे वैशिष्ट्य म्हणजे सोलापुरात अकोला पॅटर्न राबवण्याबाबत एकमताने ठराव संमत करण्यात आला. सध्या शहरात या पॅटर्नची मोठी चर्चा असून, या निर्णयामुळे आगामी महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची रणनीती अधिक स्पष्ट आणि आक्रमक होत असल्याचे दिसून येत आहे.

सदर बैठकीला उपस्थित प्रमुख पदाधिकारी
प्रशांत गोणेवार (अध्यक्ष), पल्लवी सुरवसे (महिला अध्यक्ष), महेश जाधव (युवा अध्यक्ष), विनोद इंगळे (महासचिव), संजय हरिजन (महासचिव), नरेंद्र शिंदे (युवा महासचिव), अतिश बनसोडे (लोकसभा उमेदवार), विक्रांत गायकवाड (उत्तर विधानसभा उमेदवार), श्रीनिवास संगेपाग (मध्य विधानसभा उमेदवार), गौतम थापटे (शहर संघटक), शाहिद शेख, गोटु शिंदे (युवा नेते), शिवाजी बनसोडे (ज्येष्ठ नेते), रवि थोरात (ज्येष्ठ नेते), आशालता आव्हाड, तसेच उपाध्यक्ष रोहित लालसरे, विजयानंद उघडे, अमर डुरके, प्रदीप कांबळे, डॅनी सिल्वे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत संघटनात्मक बळकटी, बूथस्तर रचना, वंचित घटकांचे मुद्दे आणि आगामी निवडणुकीतील भूमिकेबाबत निर्णायक चर्चा झाली.

यावेळी बोलताना नेते अतिश बनसोडे म्हणाले—
“ओबीसी, दलित आणि अल्पसंख्यांक समाजाचा विरोध प्रस्थापित शक्तींविरोधात तीव्र आहे. त्यांना सत्तेच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी सोलापुरात अकोला पॅटर्न काटेकोरपणे राबवणार आहोत.”

बैठकीतील चर्चांमधून हे स्पष्ट झाले की वंचित बहुजन आघाडी सोलापुरात एक सुसंघटित, रणनीतीपूर्ण आणि आक्रमक पद्धतीने निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे.

या घडामोडीमुळे सोलापुरातील राजकारणाला नवी दिशा मिळत असून, आगामी महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी भक्कम पर्याय म्हणून उदयास येत असल्याची चिन्हे दिसत आहेत.