सोलापूर : येथील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर सुरू असलेल्या 19 वर्षाखालील मुलांच्या कूच बिहार क्रिकेट स्पर्धेतील महाराष्ट्र विरुद्ध हिमाचल प्रदेश सामन्यात तिसऱ्या दिवशी सकाळी सव्वा तासात हिमाचलचे उर्वरित 3 खेळाडू बाद करत महाराष्ट्राने फॉलोऑन लादला. पहिल्या डावात 270 वर सर्व गडी बाद झाल्याने 151 धावांची आघाडी महाराष्ट्राला मिळाली.
कालची नाबाद जोडी आर्यन आणि लक्ष्य ने तिसऱ्या दिवशी सकाळी आपापली संयमी अर्धशतके पूर्ण केली व 90 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरत 250 धावा गाठून दिल्या पण हर्षिल सावंत ने आर्यनला (60 धावा 168 चेंडू, 6 चौकार) बाद करत जोडी फोडली. लक्ष्य ठाकूरने सिद्धक धील्लोन सोबत 9 व्या गड्यासाठी 20 धावांची भागीदारी रचली.
स्पर्धेत पहिलाच सामना खेळत असलेल्या महाराष्ट्राचा गोलंदाजी मधला कालचा हिरो अनिश ने पुन्हा गोलंदाजीला येत लक्ष्य ठाकूर व अंश धीमन ला लागोपाठच्या षटकात बाद करत पहिल्या डावात (66 धावांत) 6 बळी मिळवले. त्याच्या सोबतीला हर्षिल सावंत 49/3 बळी, शुभम कदम 47/1 यांनी बळी घेतले.
महाराष्ट्राने हिमाचल वर फॉलो ऑन लादत पुन्हा एकदा फलंदाजी साठी बोलाविले आणि जेवणाला खेळ थांबला तेंव्हा 8 षटकात 10 धावा करत सलामीची जोडीने संयमी फलंदाजी करण्याच्या दृष्टिकोन जाहीर केला.
जेवणानंतर अर्धशतकी सलामी दिल्यावर मात्र पहिल्या डावातील अर्धशतक वीर अर्पित सिंग (36 धावा 81 चेंडू) याला शुभम कदम ने त्रिफळाचित करत जोडी फोडली, पाठोपाठ कर्णधार आदित्यला (7 धावा) देखील बाद केले आणि 2 बाद 88 अशी धावसंख्या केली. त्यानंतर आलेल्या अरमान विज (5 धावा) याला सुआशिक जगताप ने ईशान खोंड करवी झेल बाद केले.
5 वा आलेला खेळाडू अक्षय वशिष्ठ सोबत संयमी फलंदाजी करत सलामीवीर अक्षय शर्मा ने 93 चेंडूत 4 चौकार लगावत अर्धशतक पूर्ण केले पण पुढच्याच चेंडूवर सुआशिक जगताप ने त्याला बाद करत महत्वाचा बळी मिळवला. चहापानाला खेळ थांबला तेव्हा 41 षटके झालेली होती व अक्षय वशिष्ठ – सचिन मेहता हे संघाच्या 128 धावा करत खेळपट्टीवर उभे होते आणि हिमाचल संघ अद्यापि 23 धावांनी मागे होता.
चहापान नंतर खेळ सुरू झाला व वशिष्ठ, मेहता ने तग धरून फलंदाजी करत धावफलक हलता ठेवला त्यामुळे ही जोडी फोडायला महाराष्ट्र कर्णधाराने समकित सुराणा याला पाचारण केले आणि त्याने सचिन मेहता ला (22 धावा) त्रिफळा बाद केले. दोघांनी 47 धावांची भागीदारी केली त्यानंतर आलेल्या व पहिल्या डावात उपयुक्त फलंदाजी केलेल्या आर्यन ठाकूर ला केवळ 10 धावा वर शुभम कदम ने त्रिफळा बाद केले.
तळातील खेळाडू लक्ष्य ठाकूरने अक्षय वशिष्ठ सोबत तिसऱ्या दिवशी खेळ थांबे पर्यंत संघाच्या 190 धावा फलकावर लावल्या असून हिमाचल कडे 39 धावांची आघाडी झाली असून चौथ्या दिवशी सामन्याचा निकाल अपेक्षित आहे. पहिल्या डावात 6 बळी घेणारा अनिश जोशी ने 7 षटके टाकली पण दुसऱ्या डावात त्याला अद्यापि बळी मिळाला नाही त्यामुळे उर्वरित 4 खेळाडू लवकरात लवकर बाद करून विजयासाठी आवश्यक असलेल्या धावा महाराष्ट्र संघ चौथ्या दिवशी किती षटकात पूर्ण करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
सोबत फोटो –
- आर्यन ठाकूर
- लक्ष्य ठाकूर
- अक्षय शर्मा

