सोलापूर – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे प्रबुद्ध भारत तरुण मंडळ (पी.बी ग्रुप) च्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला विविध संस्थांचे कुलगुरू विशेष अतिथी डॉ. सुधीर गव्हाणे माजी कुलगुरू यांचे हस्ते हजारो मेणबतींचे प्रज्वलन करून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
प्रथम सुरुवातीला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष (भाऊ) पवार व कार्याध्यक्ष जुबेर (भाई) बागवान यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद (दादा) चंदनशिवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय अध्यक्ष अनिल बनसोडे, अविनाश भडकुंबे, चंद्रकांत (चाचा) सोनवणे, श्रीमंत (आप्पा) जाधव, बापू जाधव, ॲड. विशाल मस्के, पी.बी. ग्रुपचे अध्यक्ष बाबा गायकवाड, उमेश रणदिवे, संतोष चंदनशिवे, नितीन बंदपट्टे, आदित्य चंदनशिवे, प्रतीक चंदनशिवे, धन्ना कापुरे, अमित माने, गुड्डू शिंदे, धोंडीबा कापूरे, चंद्रकांत निंबर्गिकर, नाना कापुरे, अनिस सय्यद, सिद्धांत सुर्वे, धीरज वाघमोडे, रवी सकट, गौतम शिंदे, सुरज गायकवाड, कुमार सांगे, आप्पा दोडमनी, लखन चंदनशिवे, मेघराज गायकवाड, खाजाप्पा निंबर्गिकर, बाळू शिंदे, दत्ता कांबळे, श्रीपती गायकवाड, तुषार गंटोल, बाळराज जाधव, विशाल मैंदर्गिकार, सिद्धांत तळभंडारे, प्रथमेश सुरवसे, सुमित चंदनशिवे, अमोल बनसोडे, कबीर इंगळे, भीमा मस्के, शुभम आंगरे, धीरज साबळे, मारुती सकट, गणेश वाघमारे, शिरीष गायकवाड, मनीष साळवे, वैभव लोखंडे, यशराज गायकवाड, दीपक भंडारी, रोहन बागले, नागेश कांबळे, सचिन बागले, राहुल बागले व कार्यकर्ते उपस्थित होते.

