सोलापूर – क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, असे गौरवोद्गार विधानसभेचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादी सोलापूरचे सहसंपर्क प्रमुख अण्णा बनसोडे यांनी काढले.
सोलापूर दौऱ्यातील दुसऱ्या दिवशी सकाळी अण्णा बनसोडे यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त सुपर मार्केट येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.शशिकांत कांबळे यांनी हा अभिवादन कार्यक्रम आयोजित केला होता.
अण्णा बनसोडे म्हणाले, महात्मा फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते.महात्मा फुले एक थोर समाज सुधारक आणि विचारवंत तसेच लेखक होते.ज्यांनी महाराष्ट्रात सामाजिक समता, स्त्री शिक्षण आणि अस्पृश्यतेविरुद्धच्या लढ्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. जातीय भेदभाव, अस्पृश्यता आणि बालविवाहसारख्या वाईट रूढिंना त्यांनी कडाडून विरोध केला. मुलींसाठी त्यांनी पहिली शाळा सुरू केली. महात्मा फुले यांच्या कार्यामुळे अनेकांना न्याय, समानता आणि आत्मसन्मानाचा मार्ग मिळाला.
महात्मा फुले जन आरोग्य योजना सारखी योजना आज सुरू आहे.या योजनेमुळे गरीब आणि दुर्बल कुटुंबांना गंभीर आजारावर उपचार घेण्याची आर्थिक मदत मिळते. महात्मा फुले यांनी सरकारी नोकरी न करता लोकसेवा आणि लोककल्याणासाठी आपले संपूर्ण जीवन वेचले. सामाजिक विषमतेविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. तसेच अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. “गुलामगिरी” यासारखे ग्रंथ लिहून त्यांनी सामाजिक अन्याय आणि अस्पृश्यतेविरुद्ध आवाज उठवण्यासाठी मोठे योगदान दिले आहेत.
दरम्यान अण्णा बनसोडे यांनी शुक्रवारच्या दौऱ्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी शहर – जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार,प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे संजीव सदाफुले माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे जेष्ठ नेते हेमंत चौधरी माजी नगरसेवक गणेश पुजारी महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, युवक प्रदेश सरचिटणीस महेश कुलकर्णी अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अमीर शेख, मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेहराज आबादीराजे, सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे, शहर सचिव दत्तात्रय बनसोडे चंद्रकांत सोनवणे वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी माजी नगरसेविका नूतन गायकवाड,अर्चना दुलंगे उमादेवी झाडबुके प्राध्यापक राहुल बोळकोटे VD गायकवाड , विकास शिंदे , शरद येच्चे उपस्थित होते….

