किसन‎ जाधव‎ संपर्क कार्यालयाचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या‎ हस्ते‎ शानदार‎ उद्घाटन

किसन‎ जाधव‎ संपर्क कार्यालयाचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या‎ हस्ते‎ शानदार‎ उद्घाटन

सोलापूर‎ :‎ प्रभाग‎ क्रमांक २२‎ चे‎ नगरसेवक किसन‎ जाधव‎ यांच्या रेल्वे लाईन सोनामाता प्रशाला समोरील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री‎ जयकुमार गोरे यांच्या‎ हस्ते मोठ्या उत्साहात‎ संपन्न झाले.‎ यावेळी‎ आमदार देवेंद्र‎ कोठे‎ यांची‎ प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या प्रारंभी‎ भारतीय‎ जनसंघाचे‎ सहसंस्थापक पंडित दीनदयाळ‎ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून‎ अभिवादन करण्यात‎ आले.‎

दरम्यान‎ ईच्छा भगवंताची‎ परिवाराच्या‎ वतीनं ढोल‎ ताशाच्या निनादात फटाक्यांच्या‎ आतिषबाजी‎ करत‎ पालकमंत्री‎ जयकुमार गोरे‎ यांना‎ भला‎ मोठा‎ हार घालून‎ त्यांचे जंगी स्वागत करण्यात‎ आले. यामुळे अवघा परिसर‎ भाजपमय झाला‎ होता. तर‎ जय‎ श्रीराम‎ जय‎ जय‎ श्रीराम चा नारा घूमल्याने‎ अवघा परिसर भगवामय‎ झाला होता. प्रभाग‎ २२‎ च्या सर्वांगीण विकासासाठी‎ किसन जाधव‎ व‎ नागेश आण्णा गायकवाड यांनी‎ कोट्यवधी‎ रुपयांचा निधी‎ आणून‎ भरीव कामे केल्याचे गौरवोद्गार‎ पालकमंत्री‎ गोरे यांनी‎ काढले.

नुकतेच‎ भाजपमध्ये प्रवेश‎ केल्यानंतर‎ प्रभाग २२ मधील चारही उमेदवार‎ मोठ्या मताधिक्याने‎ विजयी झाल्याने‎ भाजपची ताकद अधिक बळकट झाल्याचे‎ त्यांनी सांगितले. पुढील काळातही‎ विकासकामांसाठी‎ संपूर्ण‎ सहकार्य‎ राहील, अशी ग्वाही त्यांनी‎ दिली‎ आमदार देवेंद्र‎ कोठे यांनी किसन जाधव‎ यांचे कार्य लोकाभिमुख‎ व‎ प्रभावी नेतृत्वाचे उदाहरण‎ असल्याचे सांगत,‎ सोलापूर‎ शहर मध्य‎ विधानसभेत ‘इच्छा भगवंताची’ परिवाराने बजावलेल्या‎ किंगमेकर भूमिकेचा विशेष उल्लेख केला.‎ लक्ष्मण‎ मामा जाधव‎ यांच्या‎ मार्गदर्शनाखाली सक्षम नेतृत्व‎ घडल्याचे‎ त्यांनी‎ नमूद केले.

यावेळी नगरसेवक किसन भाऊ जाधव, माजी नगरसेवक‎ नागेश‎ आण्णा गायकवाड, नगरसेविका‎ चैताली‎ शिवराज‎ गायकवाड,‎ दत्तात्रय मामा‎ नडगिरी, प्रभाग क्रमांक‎ २३ चे‎ नगरसेवक राजशेखर मल्लिकार्जुन पाटील,‎ प्रभाग क्रमांक १६‎ चे‎ नगरसेविका कल्पना‎ संतोष कदम,‎ अंबादास जाधव,‎ अमोल‎ गायकवाड,‎ विनोद भाऊजी‎ गायकवाड, अँड. किरण‎ गायकवाड,‎ चेतन नागेश‎ अण्णा गायकवाड, उमेश‎ जाधव, शरद‎ शिंदे, निलेश कांबळे,संतोष गायकवाड, अजिंक्य‎ जाधव,‎ कार्तिक जाधव, माऊली‎ जरग, शहाजन शेख, शिवा पाटणकर,‎ तेजस गायकवाड,‎ उत्कर्ष गायकवाड,‎ प्रथमेश पवार, माणिक कांबळे,‎ फिरोज पठाण,‎ वसंत‎ कांबळे, महादेव राठोड, हूलगप्पा शासम,‎ अजिंक्य‎ शिंदे,‎ सचिन‎ राऊत,‎ ऋषी येवले, दिनेश‎ आवटी, नागेश जाधव आदी‎ मान्यवर उपस्थित‎ होते. कार्यक्रमात‎ किसन जाधव‎ यांनी पालकमंत्री गोरे‎ व आमदार‎ कोठे‎ यांचे‎ स्वागत‎ करून‎ पुढील‎ वाटचालीसाठी आशीर्वाद‎ व सहकार्य‎ अपेक्षित‎ असल्याचे मनोगत व्यक्त‎ केले.‎

दरम्यान‎ सोलापूर‎ महानगरपालिकेचे‎ माजी महापौर श्रीकांचनाताई यन्नम आणि आमदार‎ देवेंद्र कोठे यांच्या धर्मपत्नी सौ मोनिका‎ वहिनीसाहेब‎ यांनी देखील‎ किसन‎ जाधव यांच्या‎ संपर्क कार्यालयाला‎ भेट देऊन‎ त्यांच्या‎ पुढील‎ वाटचालीस शुभेच्छा‎ दिल्या.‎