सोलापूर – राष्ट्रवादीचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे गुरुवारपासून तीन दिवसाच्या सोलापूर दौऱ्यावर आले आहेत.स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अण्णा बनसोडे यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जानेवारी महिन्यामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहेत. या पार्श्वभूमीवर दोन महिने अगोदरच सहसंपर्क मंत्री बनसोडे यांनी सोलापूर शहरातील वातावरण पूर्णपणे ढवळून काढले आहे.
गुरुवारी दिवसभरात सदिच्छा भेटी, पक्षप्रवेश, सभा आणि बैठकांचा धडाका सुरू होता. तर शुक्रवारी सकाळपासून मान्यवरांच्या भेटीगाठी, आढावा बैठकाच्या माध्यमातून अण्णा बनसोडे यांनी संपूर्ण शहर राष्ट्रवादीमय केल्याचे दिसून येत आहे. अण्णा बनसोडे यांच्या दौऱ्यामुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा आली आहे. शुक्रवारी दुपारनंतर अण्णा बनसोडे यांनी जुळे सोलापूर तसेच विजापूर रोड भागात दौरा करून कार्यकर्त्यांची मने जिंकली. आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण असा मानला जात आहे.विजापूर रोडवरील आरटीओ ऑफिस जवळ अनिल बनसोडे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास भेट देऊन अण्णा बनसोडे यांनी नालंदा बुद्ध विहार येथे बुद्ध वंदनेला हजेरी लावली.

यावेळी बनसोडे यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर अण्णा बनसोडे काही वेळ अनिल बनसोडे यांच्या निवासस्थानी थांबले आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर प्रताप नगर रोड निर्मिती गणेश या ठिकाणी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या कार्याध्यक्ष चित्रा कदम यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली. कदम यांनी त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले.या ठिकाणी महिला कार्यकर्त्यांशी अण्णा बनसोडे यांनी संवाद साधला.त्यानंतर विजापूर रोडवरील बिलाल नगर येथे रफिक शेख यांच्या निवासस्थानी त्यानंतर सैफुल भागातील उद्धव नगरातील प्रवीण साबळे,जुळे सोलापुरातील जुना आयएमएस शेजारील चितमबा नगरातील अनिकेत व्हसुरे आणि सायंकाळच्या सत्रात प्रभाग क्रमांक ४ मधील वडार गल्ली येथील नितीन बंदपट्टे यांच्या निवासस्थानी अण्णा बनसोडे यांनी भेट दिली. या ठिकाणी वडार गल्ली येथील बंटी यमपुरे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन अण्णा बनसोडे यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान ,प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले,महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर , माजी नगरसेवक गणेश पुजारी , विद्यार्थी अध्यक्ष अनिकेत व्हसुरे अर्चना दुलंगे, उमादेवी झाडबुके, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे, वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख, शहर सचिव दत्तात्रय बनसोडे, प्रज्ञासागर गायकवाड , मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेहराज आबादीराजे ,श्यामराव गांगर्डे, दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे , यांची उपस्थित होते.

