सोलापूरच्या विकासासाठी जनविकास क्रांती सेनेत सामील व्हा

सोलापूरच्या विकासासाठी जनविकास क्रांती सेनेत सामील व्हा

सोलापूर – सत्ताधाऱ्यांनी गेल्या पंधरा वर्षात सोलापूरला भकास केले आहे., म्हणून सोलापूरचा विकास करण्यासाठी जनविकास क्रांतीसेनेत सामील होऊन जनविकास क्रांतिसेनेच्या माध्यमातून निवडणूक लढवू या असे आव्हान सोलापुरातील सर्व इच्छुक उमेदवारांना जनविकास क्रांतीसेनेचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) यांनी केले आहे.


जनविकास क्रांतीसेना पक्षाच्या कार्यकारणीची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीत सन 2025- 26 च्या महापालिका निवडणुका कामकाजाबाबत रणनीती ठरविण्याबाबत चर्चा करून आराखडा तयार करण्यात आला आणि सोलापूरचा विकास हाच ध्यास ठेवून कामकाज करण्याचे ठरले.


यावेळी बैठकीचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) यांनी बैठकीस संबोधताना म्हणाले की सोलापूर शहर हे खेडेगावाप्रमाणे झाले आहे., म्हणून शहरवासीयांना नागरी सुविधांसाठी झगडावे लागत आहे यासाठी या निवडणुकीत विकास हाच आपला ध्यास म्हणून कामकाज करू असे म्हणाले. त्याचबरोबर ज्या ज्या इच्छुक उमेदवारांनी आपापल्या पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज भरले आहेत पण पक्षाने उमेदवारी नाकारले आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवू इच्छितात अशा उमेदवारांनी जनविकास क्रांतीसेनेत सामील होऊन ए आणि बी फॉर्म संपादन करून घ्यावे असे आवाहन सर्व नागरिक बंधू भगिनींना केले.


विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जनविकास क्रांतिसेनेच्या बैठकीत त्यांच्या समवेत जनविकास क्रांति सेनेचे पदाधिकारी त्याचबरोबर रेखा आडकी, पद्मा मॅकल, सविता दासरी, विठ्ठल कुराडकर, रामबाई माटेटी, कस्तुराबाई गायकवाड, श्रीनिवास बोगा, लक्ष्मी गुंटला, लक्ष्मी रच्चा,लक्ष्मी येमुल, गुरुनाथ कोळी, नरसम्मा मालपुरी, लक्ष्मीबाई इप्पा, सुवर्णा चनमल, सुनिता चव्हाण, गौराबाई वाले, पप्पू शेख, प्रसाद जगताप यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


फोटो मॅटर
जनविकास क्रांतीसेना पक्षाच्या बैठकीत मार्गदर्शन करताना पक्षाचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) व पदाधिकारी महिला कार्यकर्ते बंधू-भगिनी दिसत आहेत.