बोरूळ मध्ये संभाजी आरामारच्या शाखेचे उदघाटन

बोरूळ मध्ये संभाजी आरामारच्या शाखेचे उदघाटन

सोलापूर शेकडो कार्यकर्त्यांसोबत होटगी स्टेशन, हिपळे, आहेरवाडी, तिल्हेहामळ आणि बोरूळ या गावांमध्ये मोठया उत्साहात वाजत गाजत संभाजी आरामारच्या शाखांचा उदघाटन सोहळा संपन्न झाला.

मागील 17 वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांची लोककल्याणकारी विचारधारा प्रत्यक्षात आणत संभाजी आरमार जनतेसाठी सातत्याने कार्यरत आहे. संभाजी आरमारचे शेकडो मावळे हा शिव विचारांचा रयत हिताचा वसा प्रामाणिकपणे जोपासत आहेत. त्यामुळेच सर्वदूर उत्स्फूर्तपणे संभाजी आरमार विस्तारतच आहे.

या शाखांच्या माध्यमातून नव्याने शेकडो कार्यकर्ते संभाजी आरमारच्या सैन्यात सामील झाले आहेत. या युवा शक्तीचा उपयोग युवकांना निर्व्यसनी बनवत सक्षम बनवण्यासोबतच जनहितासाठी करून संभाजी आरमार मजबूत आणि शिव विचार बुलंद करण्यासाठी करू असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष श्रीकांत बापू डांगे यांनी केले .


यावेळी संभाजी आरमार चे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, जिल्हाप्रमुख अनंतराव निळ, जिल्हा संघटक अमित कदम,शहरप्रमुख सागर ढगे, दक्षिण तालुका प्रमुख ज्ञानेश्वर डोंबाळे, प्रमोद जगताप, राजशेखर बोरेगाव, बालाजी पवार,हिप्पळे शाखाप्रमुख हकीम मुल्ला, होटगी स्टेशन शाखाप्रमुख शशिकांत पटणे,अहेरवाडी शाखाप्रमुख सिध्दाराम कोंराळे,तिल्हेहाळ शाखाप्रमुख चिदानंद बंडगर,बोरूळ शाखाप्रमुख भिरू चिन्नेकर यांची उपस्थिती होती.