प्रभाग क्र. २२‎ मध्ये‎ टाकारी‎ समाजासाठी‎ सांस्कृतिक हक्काचे स्वप्न साकार

प्रभाग क्र. २२‎ मध्ये‎ टाकारी‎ समाजासाठी‎ सांस्कृतिक हक्काचे स्वप्न साकार

सोलापूर – प्रभाग क्रमांक २२‎ येथे‎ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे‎ नागरी‎ वस्ती सुधारणा‎ योजनेअंतर्गत टकारी‎ समाजासाठी उभारण्यात‎ आलेल्या‎ सांस्कृतिक‎ भवनाचा भव्य‎ उद्घाटन‎ सोहळा‎ उत्साही व‎ ऐतिहासिक‎ वातावरणात संपन्न झाला. महाराष्ट्र‎ राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रवादी‎ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा‎ खासदार‎ सुनील‎ तटकरे‎ यांच्या मार्गदर्शनाखाली‎ तसेच‎ राष्ट्रवादी‎ काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष‎ व प्रभाग क्र. २२ चे‎ लोकप्रिय नगरसेवक‎ किसन‎ जाधव‎ आणि‎ सहकारी नगरसेवक‎ नागेश‎ गायकवाड यांच्या‎ अथक‎ व विशेष‎ प्रयत्नातून‎ हा‎ महत्त्वाकांक्षी विकासप्रकल्प‎ साकार झाला आहे.


विशेष म्हणजे‎ उपमुख्यमंत्री‎ अजित‎ पवार यांच्या विशेष‎ विकास निधीतून ५०‎ लाख‎ रुपयांचा‎ भरीव‎ निधी‎ या सांस्कृतिक भवनासाठी‎ मंजूर‎ करण्यात आला‎ असून, त्यामुळे‎ टाकारी‎ समाजाच्या सांस्कृतिक,‎ सामाजिक व‎ शैक्षणिक‎ उपक्रमांना‎ कायमस्वरूपी‎ व्यासपीठ उपलब्ध झाले‎ आहे.‎ याप्रसंगी‎ टाकारी समाजाच्या‎ वतीने‎ नगरसेवक किसन‎ जाधव‎ व नगरसेवक नागेश‎ गायकवाड यांचा‎ शाल व‎ फेटा‎ बांधून सन्मान करण्यात आला. समाजाच्या‎ विकासासाठी‎ निधी‎ उपलब्ध‎ करून दिल्याबद्दल‎ समाजबांधवांनी त्यांच्याप्रती‎ कृतज्ञता‎ व्यक्त‎ केली‎ यावेळी‎ समाजाचे‎ जेष्ठ टकारी समाजाचे अध्यक्ष गैबू‎ (काका)जाधव,‎ डॉक्टर सायबु‎ गायकवाड, युवक अध्यक्ष‎ विनोद जाधव‎ यांनी आपले मनोगत‎ व्यक्त‎ करत‎ किसन जाधव‎ आणि नागेश‎ गायकवाड‎ यांचे‎ आभार मानले‎ तसेच टकारी‎ समाजातील‎ राष्ट्रीय‎ खेळाडू अंबादास‎ गायकवाड यांची कबड्डी राष्ट्रीय‎ प्रशिक्षक (कोच)‎ पदी निवड‎ झाल्याबद्दल नगरसेवक‎ किसन जाधव‎ यांच्या हस्ते शाल‎ व पुष्पगुच्छ‎ देऊन त्यांचा विशेष‎ सन्मान करण्यात‎ आला‎ व पुढील‎ वाटचालीस शुभेच्छा देण्यात‎ आल्या.‎

टकारी समाज हा‎ परिश्रम,‎ एकजूट आणि‎ स्वाभिमान जपणारा समाज म्हणून ओळखला जातो. समाजाची‎ सांस्कृतिक‎ ओळख जपली जावी,‎ युवकांना दिशा मिळावी‎ आणि‎ पुढील‎ पिढीला‎ संस्कारांचे केंद्र‎ उपलब्ध‎ व्हावे, या‎ भावनेतूनच‎ किसन जाधव व नागेश गायकवाड‎ यांनी‎ सातत्याने पाठपुरावा‎ करून हा निधी मंजूर‎ करून‎ घेतला, अशी‎ भावना‎ उपस्थित‎ समाजबांधवांनी‎ व्यक्त‎ केली. या‎ उद्घाटन सोहळ्यास‎ टाकारी‎ समाजातील ज्येष्ठ‎ व मार्गदर्शक‎ मान्यवर मोठ्या संख्येने‎ उपस्थित होते.

यामध्ये गैबु‎ (काका)जाधव‎ डॉ.‎ साहेबराव गायकवाड, बसु मामा‎ गायकवाड, शिवाजी जाधव, सुनील जाधव, विद्यासागर‎ (पिंटु)जाधव, तुकाराम‎ मामा जाधव,‎ भारत‎ जाधव, सायबु‎ गायकवाड‎ सुहास‎ सर राजु‎ जाधव दिपक‎ (सरपंच)जाधव‎ यांच्यासह समाजाचे आधारस्तंभ‎ सहभागी‎ झाले होते. युवकांचे नेतृत्व‎ करत टाकारी समाज युवक‎ अध्यक्ष विनोद‎ जाधव,‎ तसेच‎ सचिन‎ अक्षय जाधव, सूर्यकांत मामा‎ गायकवाड,‎ राजाराम जाधव,‎ सचिन‎ जाधव,‎ अंबादास‎ गायकवाड, सुहास सर‎ जाधव‎ निखिल हैसनुर आदी युवक कार्यकर्ते मोठ्या‎ संख्येने‎ सहभागी‎ झाले‎ होते. यावेळी महिला भगिनींची‎ उपस्थितीही उल्लेखनीय‎ ठरली.


पारुबाई जाधव प्रयगाबाई गायकवाड,‎ इंदुताई‎ गायकवाड, पुनमताई‎ गायकवाड, राजश्रीताई जाधव, नेहा(डॅाली)जाधव महादेवीताई‎ जाधव, कमळाताई जाधव, रेखाताई‎ गायकवाड, शांताताई गायकवाड, भिमताई गायकवाड‎ यांच्यासह‎ माता-भगिनी बहुसंख्येने‎ उपस्थित‎ होत्या.‎ या‎ प्रसंगी उपस्थित‎ समाजबांधवांनी किसन जाधव व‎ नागेश गायकवाड‎ यांच्या समाजाभिमुख, विकासनिष्ठ‎ नेतृत्वाचे‎ विशेष कौतुक‎ केले.‎ समाजाच्या‎ गरजा समजून घेणारे,‎ निधी आणणारे आणि‎ प्रत्यक्ष‎ काम पूर्ण करणारे नेतृत्व‎ म्हणून‎ त्यांचा गौरव करण्यात‎ आला.‎

टकारी‎ समाजासाठी‎ हे‎ सांस्कृतिक भवन‎ म्हणजे केवळ‎ इमारत‎ नसून, एकतेचे,‎ स्वाभिमानाचे‎ आणि पुढील‎ पिढीच्या‎ उज्ज्वल भवितव्याचे‎ केंद्र‎ ठरणार आहे,‎ अशी भावना‎ यावेळी व्यक्त‎ करण्यात‎ आली.‎ एकूणच,‎ हा उद्घाटन सोहळा‎ राष्ट्रवादी काँग्रेसच्या‎ सामाजिक बांधिलकीचा, विकासाभिमुख राजकारणाचा‎ आणि‎ किसन जाधव,‎ नागेश गायकवाड यांच्या‎ समाजनिष्ठ नेतृत्वाचा ठसा‎ उमटवणारा‎ ठरला.‎