प्रभाग २२‎ मध्ये‎ पालकमंत्री‎ जयकुमार‎ गोरे यांच्या‎ उपस्थितीत‎ किसन‎ जाधव पॅनलचा‎ महाशक्तीप्रदर्शन‎ रोडशो

प्रभाग २२‎ मध्ये‎ पालकमंत्री‎ जयकुमार‎ गोरे यांच्या‎ उपस्थितीत‎ किसन‎ जाधव पॅनलचा‎ महाशक्तीप्रदर्शन‎ रोडशो

सोलापूर‎ – प्रभाग‎ क्रमांक २२ मध्ये‎ भारतीय‎ जनता पार्टीचे‎ अधिकृत उमेदवार किसन जाधव,‎ दत्तात्रय नटगिरी, अंबिका‎ नागेश‎ गायकवाड‎ व‎ चैत्राली गायकवाड‎ यांच्या‎ प्रचारार्थ काढलेला‎ भव्य‎ रोडशो म्हणजे‎ जणू‎ विजयाचा‎ गुलाल‎ उधळणारी‎ विजयदर्शी पदयात्राच‎ ठरली.

रामवाडी‎ शासकीय गोदामापासून सोनी‎ नगर,‎ रेवणसिद्धेश्वर नगर,‎ विजापूर नाका मार्गे रामवाडी मुख्य‎ रस्त्यापर्यंत‎ निघालेल्या या पदयात्रेत‎ हजारो‎ महिलांनी‎ हातात‎ भाजपचे झेंडे घेऊन‎ उत्स्फूर्त सहभाग नोंदवला‎ आणि अवघा‎ परिसर भगवामय झाला.‎ या‎ शक्तीप्रदर्शनात‎ पालकमंत्री‎ जयकुमार गोरे,‎ आमदार देवेंद्र कोठे, भाजप‎ युवा नेते‎ मनीष‎ देशमुख व‎ मोनिका‎ देवेंद्र कोठे‎ यांची उपस्थिती विशेष ठरली. विकास म्हणजे भाजप आणि भाजप‎ म्हणजे‎ विकास.

प्रभाग २२‎ च्या सर्वांगीण विकासासाठी‎ निधी‎ कमी पडू‎ देणार नाही, अशी‎ ठाम‎ ग्वाही‎ पालकमंत्री‎ गोरे यांनी देत‎ किसन‎ जाधव‎ व‎ नागेश‎ गायकवाड यांच्या‎ पाठीशी भाजप सरकार‎ खंबीरपणे उभे‎ असल्याचे‎ स्पष्ट केले. आमदार देवेंद्र कोठे यांनीही जाधव पॅनलला मोठ्या मताधिक्याने विजयी‎ करण्याचे‎ आवाहन केले.

किसन जाधव‎ म्हणाले‎ की मुख्यमंत्री देवेंद्र‎ फडणवीस यांनी‎ प्रभाग २२‎ साठी‎ भरघोस‎ निधी मंजूर केला‎ असून पालकमंत्री‎ गोरे, आमदार‎ विजयकुमार‎ देशमुख, आमदार सुभाष‎ देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या‎ नेतृत्वाखाली प्रभागाचा‎ विकास‎ आता थांबणार नाही. मोनिका‎ कोठे‎ यांनी या‎ पदयात्रेला‎ प्रत्यक्ष विजययात्रा‎ संबोधले.


लक्ष्मण मामा‎ जाधव‎ व‎ माजी नगरसेवक नागेश‎ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित‎ या‎ रोडशोला मिळालेला‎ अभूतपूर्व‎ प्रतिसाद, विशेषतः‎ महिलांची विक्रमी उपस्थिती,‎ शहरातील इतर‎ कोणत्याही‎ प्रभागात‎ न पाहिलेला असल्याची चर्चा‎ आहे. यावरून किसन जाधव व नागेश‎ गायकवाड‎ यांचे‎ वर्चस्व‎ स्पष्ट होत असून‎ भाजपाचे चारही‎ उमेदवार‎ मोठ्या मताधिक्याने‎ विजयी होतील, असा ठाम‎ अंदाज राजकीय वर्तुळात‎ व्यक्त‎ केला‎ जात आहे.‎