नवीन वर्षात इंदिरागांधी स्टेडियमवर महाराष्ट्र वीरुद्ध त्रीपुरा क्रीकेट सामना

नवीन वर्षात इंदिरागांधी स्टेडियमवर महाराष्ट्र वीरुद्ध त्रीपुरा क्रीकेट सामना

सोलापूर – च्या 23 वर्षाखालील मुलांच्या कर्नल सी के नायुडू चषकातील दुसऱ्या सत्रातील चौथ्या फेरीच्या सामन्यांना 23 जानेवारी पासून सुरुवात होत असून या अंतर्गत सोलापुरात इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर महाराष्ट्र संघाचा सामना उत्तर पूर्व भारतातील त्रिपुरा संघाशी होणार असल्याचे जिल्हा क्रिकेट संघटनेचे वतीने कळविण्यात आले.

स्पर्धेच्या पहिल्या सत्रात 5 नोव्हेंबर पर्यंत पार पडलेल्या पहिल्या 3 फेरीच्या सामन्यात एलीट क गटात महाराष्ट्र संघ सध्या 1 विजया सह 28 गुणांसह संयुक्त दुसऱ्या स्थानावर असून त्रिपुरा संघ 20 गुण प्राप्त करून 6व्या क्रमांकावर आहे.


महाराष्ट्र संघ आधीच सोलापुरात दाखल झाला असून त्रिपुरा संघ काल 20 तारखेला दुपारी सोलापुरात आला असून काल 21 रोजी सकाळ दुपार असे 2 सत्रात सराव केला आहे तर 22 रोजी सकाळच्या सत्रात दोन्ही संघ सराव करणार असून त्यानंतर सामनाधिकारी महत्वाची बैठक घेतील आणि 23 तारखेला सकाळी 9.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.

हा सामना 4 दिवसीय असून या सामन्यासाठी अधिकारी म्हणून मनीष माजीथिया, मैदानी पंच म्हणून के. मनोहरन व अश्वनी मन्धानी, गुणलेखक म्हणून पुण्याचे कपिल खरे व हैदराबादचे मिर सामी अली, व्हिडिओ अनालिस्ट म्हणून गुरूप्रसाद कुडव, सहाय्यक कार्तिक हे असणार असून त्यांचे सोबत स्थानिक व्यवस्थापक म्हणून चिराग शहा, विशाल कुलकर्णी, निखिल मादास हे असणार आहेत.


सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेच्या वतीने सामन्याची संपूर्ण जय्यत तयारी करण्यात आली असून विविध समिती स्थापन करण्यात आल्या व त्यातील सदस्य योग्य ते कार्य करत आहेत.

दोन्ही संघ पुढीलप्रमाणे –
महाराष्ट्र : सचिन धस (कप्तान), अजय बोरुडे, साहिल औताडे, दिग्विजय पाटील, स्वराज चव्हाण, अभिषेक निषद, शुभम मेड, किरण चोरमले, हर्ष मोगावीरा, अब्दुस सलाम, अनिरुद्ध साबळे, साहिल पारेख, निखिल लोणावत, वैभव दारकुंडे, प्रथमेश गावडे, अभिषेक पवार.

त्रिपुरा : संदीप सरकार (कप्तान), नाबारुन चक्रबोर्ती, अरींदम बर्मन, आनंध भौमिक, सप्तजित दास, प्रियांश मित्रा, दुर्लब रॉय, दीपजोय देब, प्रीतम दास, तनमोय दास, साहिल सुलतान, तनय मंडल, राजदीप दत्ता, सौरव कार, दीपेन बिस्वास, पामीर देबनाथ, देबराज डे, अमित अली, स्वरब सहानी, अर्काजीत रॉय, पौरुष मिश्रा