सोलापूर – सोलापुर शहरातील नागरिकांना होत असलेल्या विविध अडचणी संदर्भात अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे व विधानसभा उपाध्यक्ष तथा पिंपरी चिंचवडचे आमदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर जिल्हा सह संपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती.
त्यानुसार दि. ८/१२/२०२५ रोजी नागपूर येथे विधानसभा अधिवेशना दरम्यान उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेचे अधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी तसेच पत्रकारांची महत्त्वाची बैठक घेतली. त्या अनुषंगाने खालील विषय मार्गी लावण्यात यावेत अशी मागणी करत आहोत.
१) सोलापूर शहरातील विस्काळीत रात्री अपरात्री होणार पाणीपुरवठा बंद करणे विविध ठिकाणी नव्याने टाक्यांची उभारणी करणे तसेच हद्दवाढ भागातील जुन्या व प्लास्टिक लाईन काढेण व या भागात जास्त चावीवाले व स्वतंत्र पाणीपुरवठा कर्मचारी कक्ष नेमणे.
२) सोलापूर शहरातील रमाई घरकुल आवास योजना चुकीच्या धोरणांमुळे हजारो लाभार्थी लाभापासुन वंचित असुन सोलापूर समाज कल्याण विभाग/सोलापूर महानगरपालिका रमाई आवास घरकुल योजना समुदाय संघटक व म.न.पा. चा टेक्नीकल विभाग लाभार्थ्यांना शासनाच्या विकासाच्या विरुध्द जावून कारवाई करत असलेले बाबत….
३) दि. 13/10/2024 च्या मा. शासन निर्णयानुसार (जी.आर सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग) नुसार अंमल बजावणी करणे.
४) सोलापूर महानगरपालिका सेवेत कामावर सातत्याने गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावर सहानुभुती दाखवून पूर्ववत कामावर घेण्यासाठी सो.म.पा. आयुक्तांना शिफारस करणे.
५) सोलापूर महानगरपालिकेतील झाडुवाली, बिगारी, सफाई कामगार इ. रोजंदारी बदली कर्मचारी काम करीत असताना मयत झाल्यास त्यांच्या वारसांना मा. लाड कमिटी अंतर्गत सो.म.पा. सेवेत समाविष्ट करणे.
६) सोलापूर महानगरपालिकेतील मानधन व कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेल्या संगणक, आवेक्षक, पाणीपुरवठा, मंडई, मलेरिया व इतर विभागातील कर्मचाऱ्यांना कायम करणेबाबत…
७) लाड समितीच्या शिफारशीनुसार २ पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्ती देणे.
८) लाड समितीच्या शिफारसी अंतर्गत सो.म.पा. सेवेत समाविष्ट होणाऱ्या सेवकांना पदोन्नती मिळणे.
९) लाड कमिटी अंतर्गत नव्या आणि नियमित अर्जाची स्वतंत्र कार्यवाही होणे.
१०) 249 रोजंदारी व बदली कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे.
वरील विषयासंदर्भातील सोलापुर शहरातील नागरिकांना होत असलेल्या अडचणी संदर्भात नागपूर येथील बैठकीच्या अनुषंगाने लवकरात लवकर योग्य ती अंमलबजावणी व्हावी या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद (दादा) चंदनशिवे यांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे यांच्याकडे मागणी केली.
यावेळी नगरसेवक गणेश पुजारी, बापू जाधव उपस्थित होते.

