सोलापूर – सोलापूर शहरात आगामी काळात निवडणुक जवळ आल्याने फुकट प्रसिद्धीसाठी नो डिजिटल झोन मध्ये व इतर चौकामध्ये मोठ्या संख्येने वेगवेगळ्या कार्यक्रमाचे व शासकीय व खासगी दौर्यावर येणार्या राजकिय पक्षाचे नेत्यांचे स्वागत शुभेच्छा फलकाचे अनाधिकृत डिजिटल फलक लावले जात आहेत.
शहराच्या विविध भागात विनापरवाना डिजिटल फलकांचे अक्षरशः पेव फुटले असून अनाधिकृत डिजिटल फलक लावणाऱ्यावर व फलकावरील व्यक्तीविरुद्ध गुन्हे दाखल करावेत व उच्च न्यायालयाचे आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशी मागणी छत्रपती ब्रिगेड च्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
महानगरपालिकेचेवतीने वेळोवेळी फलक काढण्याची मोहीम राबवून ही चौकाचौकात डिजिटल फलक उभारली जात आहेत त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून शहराचे विदूरूपीकरण हे मोठ्या प्रमाणात होत आहे. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, व महानगरपालिका आयुक्तांनी डीजे मुक्त सोलापूर केले आहे त्याच पद्धतीने डिजिटल मुक्त सोलापूर शहर करावे अशी मागणी करण्यात आली आहे. महानगरपालिका हद्दीत डिजिटल फलक उभारण्यासाठी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाची परवानगी न घेताच अनेक भागांमध्ये डिजिटल फलक लावले जात आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे आदेशाकडे महानगरपालिका प्रशासन काना डोळा करीत आहेत तसेच अशा अनाधिकृत डिजिटल लावणार्यावर कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेचे अधिकाऱ्यांची भूमिका उदासीन दिसत आहेत व या कारवाईत सातत्य दिसून येत नाही त्यामुळे अशा अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी.
अनाधिकृत डिजिटल उभारल्यामुळे महानगरपालिकेच् उत्पन्नात सुद्धा मोठी घट होत आहे. त्याचबरोबर शहरांमध्ये अनेक ठिकाणी मोठ मोठे होर्डिंग लावण्यात आलेले आहेत या होर्डिंग चे परवानगी काढताना आकारमान कमी दाखवून प्रत्यक्ष परवानगी घेतलेल्या होर्डिंग च्या संख्येपेक्षा पेक्षा अधिक संख्येने मोठे मोठे होर्डिंग अनधिकृत पणे अधिकाऱ्यांशि संगणमत करून महानगरपालिकेची फसवणूक करीत आहेत त्याचीही तपासणी करण्यात यावी व अशा मक्तेदारावर कारवाई करण्यात येण्याची मागणी केली आहे.
यावेळी छत्रपती ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष अरविंद शेळके जिल्हा सचिव सीताराम बाबर जिल्हा उपाध्यक्ष गजानंद शिंदे सिद्धाराम कोरे ओंकार कदम रमेश चव्हाण आदी उपस्थित होते.

