सोलापूर :- आरोग्य हीच खरी संपत्ती आहे हा म्हण खूप प्रसिद्ध आहे पण आरोग्य हे सगळं काही असून संपत्तीपेक्षा महत्त्वाचे आहे शरीर आणि मन यांच आरोग्य एकमेकांशी निगडित आहे, जर माणसाचे आरोग्य उत्तम असेल तर तो आयुष्यात काहीही करू शकतो असं प्रतिपादन प्रवीण दर्गोपाटील मित्रपरिवार च्या वतीने आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या वाढदिवसानिमित्त लहानापासून मोठ्यांसाठी मोफत आरोग्य सेवेचा महायज्ञ महावीर भवन येथे आयोजित करण्यात आला होता.
प्रारंभी आरोग्य शिबिराचे उद्घाटन ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे महापूजन व दीपप्रज्वलन मा. आ. विजयकुमार देशमुख,शिवानंद काका मेंडके, सोमनाथ भोगडे,महेश हिंडोळे,मोहन डांगरे व प्रवीणजी दर्गो पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर सागर हिरेहब्बू, काशिनाथ दर्गोपाटील, अमर पुदाले,नागेश भोगडे, सौ. सोनाली मुटकरी, तुळशीदास भुतडा, जाकीर सगरी, दीनानाथ धुळम, भैय्या बनसोडे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

या आरोग्य शिबिरात सर्व रोग निदान तपासणी ६४०,हृदय व मधुमेह त पासणी २८०, कॅन्सर ४५, स्त्रीरोग ४५,हाडाची तपासणी ६५, किडनी तपासणी ३०,गरजूंनी लाभ घेतला. यावेळी २८० रुग्णांनी नेत्र तपासणी करून घेतली. ६० लोकांचे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया या शिबिराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. विजयकुमार देशमुख मालकांचे ६९ व्या वाढदिवसानिमित्त ६९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. महाआरोग्य शिबीर साठी सोलापूर शहर जिल्ह्यातील व पुणे च्या सर्व हॉस्पिटलचे डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांनी योगदान दिले मोफत औषधोपचार वाटप सुद्धा करण्यात आले आणि ११६० नागरिकांचे आयुष्यमान कार्ड काढून त्यांना प्रदान करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे डॉ. जयकारा सर व महात्मा फुले आरोग्य योजनेचे प्रमुख सौ. शशिकाला जगताप यांनी सुद्धा आरोग्य शिबिरासाठी बहुमूल्य योगदान दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण दर्गो पाटील यांनी केले सूत्रसंचालन गुरुनाथ निंबाळे यांनी केले व आभार प्रदर्शन सचिन कुलकर्णी यांनी मान ले. आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी देविदास चेळेकर, अमित कलबुर्गी, रोहित ईटगी, ओंकार भुरळे,श्रीनाथ गायकवाड, गणेश साखरे, समर्थ व्हटकर,सचिन दासमाने, रवी आतनुरे, सिद्धलिंग के शेट्टी, सोमनाथ नंदुरे, अंबालाल भिमनपल्ली, अमर शिरशेट्टी, ऋषी दर्गोपाटील, श्रीशैल सास्तुर, अमोल बडवणे, शंकर बिद्री,आदींनी परिश्रम घेतले..

