सोलापूर – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर अस्थिविहार, (प्रेरणाभूमी) थोरला राजवाडा, मिलिंद नगर, बुधवार पेठ, सोलापूर. येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या २६ व २७ नोव्हेंबर १९२७ रोजी महार वतनदार परिषदेच्या सोलापूर प्रथम भेटीस 98 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वर्धापन दिन व सोलापूर महार वतनदार ऐतिहासिक परिषदेत उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या वारसांचा सन्मान सोहळा महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष तथा पिंपरी चे आमदार मा.ना.श्री अण्णा बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
प्रथमत : या कार्यक्रमाच्या वेळी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा साहेब बनसोडे यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार (प्रेरणाभूमी) या ठिकाणी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशास अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर दिनांक. २७ व २७ नोव्हेंबर १९२७ या दिवशी भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सोलापूर दौऱ्यावर आले असता थोरला राजवाडा, मिलिंद नगर, बुधवार पेठ, पंचाची चावडी येथे महार वतनदार ऐतिहासिक परिषद त्यांच्या उपस्थितीत झाली होती. त्यावेळचा संपूर्ण प्रसंग महापालिकेच्या माध्यमातून ब्राँझचा शिल्प बनवण्यात आला आहे. या ऐतिहासिक महार वतनदार परिषदेच्या शिल्पास अभिवादन करून ऐतिहासिक महार वतनदार परिषदेमध्ये उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या वारसांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यानंतर कुमार तुकाराम बनसोडे, सुरेश बाबू तळभंडारे, मिलिंद गणपत बनसोडे, गंगाधर सरवदे, सोनप्पा सुतकर, सुमनताई बाबरे, मारुती नारायण साळवे, सुधाकर तळभंडारे, शोभा तळभंडारे, महादेव तळमोहिते या मान्यवरांचा व वारसांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष आनंद (दादा) चंदनशिवे प्रस्ताविक मनोज व्यक्त करताना व्यक्त केले की, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या या बुधवार पेठ बुधवार पेठ परिसरातील थोरला राजवाडा मिलिंद नगर ऐतिहासिक पंचांच्या चावडीचा ९८ वा वर्धापन दिन त्याचबरोबर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिविहार (प्रेरणाभूमी) या ठिकाणी जी ऐतिहासिक पंचाची चावडी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीमध्ये २७ व २७ नोव्हेंबर १९२७ रोजी ज्या ठिकाणी अण्णासाहेब आपण बसलेला या ठिकाणी बाबासाहेबांच्या उपस्थितीमध्ये समस्त महार वतनदार परिषदेचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळाचे उपाध्यक्ष आणि पिंपरीचे आमदार ज्यांनी माझ्यासारखे तीन तीन वेळा नगरसेवक या ठिकाणी राहिलेले आहेत. तसेच पिंपरीच्या भागातले तीन वेळा नगरसेवकांच्या जोरावर तीन वेळा आमदार झाले आपले आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते. मोहोळ तालुक्यामध्ये मोहोळ गावांमधील एका आंबेडकरी समाजामध्ये जन्माला आलेला आपल्या आयुष्याचा काही तर भलं होईल म्हणून पुण्यासारख्या शहरांमध्ये पुण्याच्या कुठल्या तरी कोपऱ्यातल्या वस्तीमध्ये आपले आयुष्य घडवण्यासाठी निघालेला व्यक्ती आज बाबासाहेबांच्या संविधानामुळे बाबासाहेबांच्या विचारामुळे आज महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी मा.अजितदादा यांच्या माध्यमातून या ठिकाणी बसलेला आपला भीमसैनिक आहे.

हा कार्यक्रम म्हणजे आंबेडकरी समाजाचा एक आत्मा आहे. या आंबेडकरी समाजाचा आत्मा असणाऱ्या मिलिंद नगर मध्ये अनेक कार्यक्रमावर झाले परंतु या ठिकाणी अस्थिविहार आणि पंचाची चावडी या मिलिंद नगर मधल्या नाही सोलापूर शहर जिल्ह्यामधल्या सर्व भीमसैनिकांचे प्रेरणास्थान आहे. बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण झाला तो ६ डिसेंबर १९५६ ला आणि ११ डिसेंबरला १९५६ रोजी या आस्थि फॉरेस्ट या ठिकाणी ५००० भीमसैनिकांनी सोलापूर येथे आणल्या त्यानंतर त्या अस्थी विठ्ठल मंदिरामध्ये या ठिकाणी ठेवली होती या विठ्ठल मंदिरामध्ये अस्थी ठेवल्यानंतर माझ्या पूर्वीच्या नगरसेविका लक्ष्मी बाबरे ताईने चांगल्या स्वरूपात ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा प्रयत्न यशस्वी झालेला नाही. या वस्ती मधल्या सगळ्या बसलेल्या घराघरांमध्ये असलेल्या या लोकांनी माझ्यासारख्या आंबेडकरी विचाराच्या तरुणाला या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून दिल्यानंतर २००७ पासून या ठिकाणी १५ वर्षांमध्ये हे माझ्या पद्धतीने या ठिकाणी जेवढा डेव्हलपमेंट करता येते तेवढे या वस्ती मधल्या प्रत्येक जणांचा सहकार्य घेऊन या ठिकाणी काम केले. सोलापूर शहरांमध्ये आमचा सारखा बुद्ध विहार आणि आमच्यासारखा अस्थिविहार सोलापूर मध्ये कुठेच नाही.
या ठिकाणी अण्णासाहेब तुम्ही शंभर कार्यक्रम घेचाल पण ज्या ठिकाणी बाबासाहेबांचे पाय लागलेला ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा वास्तव्य झालंय या ठिकाणचा कार्यक्रम म्हणजे तुमच्या जीवनातला सर्वात श्रेष्ठ कार्यक्रम आहे.
महिलांच्या भावना आहे त्या आणि अजून एक विषय साहेब नगरसेवक असताना तर रमाई घरकुल आवास योजना सगळ्यांना मिळाली पण आता महापालिकेने पत्र पाठवले उतारा मागत आहेत. या वस्तीमध्ये एक सुद्धा पत्र्याचे घर नाही राहिले पाहिजे. सोलापूर महानगरपालिकेचे मा. आयुक्त यांच्याबरोबर बैठक घेऊन हा विषय मार्गी लावा. यावेळी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष मा.ना.श्री.अण्णा बनसोडे यांनी व्यक्त करताना म्हणाले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या २६ व २७ नोव्हेंबर १९२७ महार वतनदार परिषदेच्या सोलापूर प्रथम भेटीस आज वर्षे ९८ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वर्धापन दिन व संविधान दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महार वतनदार परिषदेसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबत त्यावेळी त्यांचे सहकारी उपस्थित होते. त्यांचे आज नातेवाईक या ठिकाणी उपलब्ध आहेत त्या नातेवाईकांचा सत्कार आनंद दादा चंदनशिवे यांच्या वतीने या करण्यात आला. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिले न्याय समता बंधुता स्वातंत्र्य ह्या मूलभूत आधारावर खरंतर हे संविधान दिले आज आपण या पवित्र ठिकाणी जो हा कार्यक्रम घेतलेला आहे. आनंद दादांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच आहे तुम्ही आम्ही खूप भाग्यवान आहोत ज्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली त्या भूमिती आजचा हा कार्यक्रम होत असताना तुम्हाला आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला नक्कीच आनंद वाटण्यासारखा आजचा दिवस आहे. राजकारणामध्ये काम करत असताना सत्कार समारंभ सोहळे होत असतात पण आनंदरावाचा हा जो कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी आयोजित केला हा आयुष्यातला सर्वात अतिशय चांगला आणि लक्षात राहणारा हा कार्यक्रम आणि आजचा दिवस असणार आहे आपण या परिसरामध्ये सलग पंधरा वर्षे सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवून आपल्या या मिलिंद नगर परिसरामध्ये समाजाच्या दृष्टिकोन असणारे समाजाचे महत्त्वाचे आणि मूलभूत असे प्रश्न सोडवण्याचे काम आपल्याकडं यापूर्वी केले गेलेले आणि पुढील काळातही केले जाईल असं मला ठाम विश्वास आहे. पंचाची चावडी व अस्थिविहार स्मारक व्हावे मराठवाडा विद्यापीठ कमानीचे काम मंजूर करण्यात यावे ह्या कामासाठी आनंद भाऊ तुमच्याकडून आणि तुमच्या सर्व सहकार्याने गेले अनेक दिवसापासून प्रयत्न चालू आहे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे मला आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र विधानसभेचा उपाध्यक्षपदी काम करण्याची खऱ्या अर्थाने संधी मिळालेली बाबासाहेबांचा आपल्या सर्वांवर असलेले ऋण फेडण्याच्या उद्देशानेच आपण ज्या या दोन मागण्या केलेल्या त्यातील महत्त्वाची मागणी पंचाची चावडी आणि विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार प्रेरणाभूमी खऱ्या अर्थाने जर बघितलं तर बाबासाहेबांचे दोन दिवस वास्तव्य आपल्या भागामध्ये राहून गेलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून या स्मारकाला राष्ट्रीय स्मारक चा दर्जा महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येईल आणि त्याचा सर्व पाठपुरावा माझ्या वतीने करण्यात येईल एवढ्या आश्वासन मी या ठिकाणी देतो आणि आज या पवित्र दिनाला ९८ वर्षे पूर्ण होत असताना आनंद दादा आणि या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना एक शब्द देतो की १०० वर्षे पूर्ण व्हायच्या आधी राष्ट्रीय स्मारक महाराष्ट्र शासनाच्या वतीने जाहीर केले जाईल याचे मी आश्वासन या ठिकाणी देतो. आजपर्यंत आनंददादांनी जो काही निधी महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित केला आणि त्याच्या आधारे जे विकास काम या ठिकाणी केलेली आनंद दादा यांच्या माध्यमातून झालेला विकास आणि त्याच्या हातून राहिलेल्या अर्धवट काम पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून माझ्या वतीने महाराष्ट्र शासनाचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली उद्या होणाऱ्या महानगरपालिकेची निवडणूक होत असताना तुमच्यासाठी मी दिलेला शब्द देतो शंभर टक्के पाळणार. या ठिकाणी उपस्थित असलेले माझ्या सर्व भगिनी असतील माझे सर्व बांधकाम असतील माझे सर्व वडीलधारी मंडळी असतील तुम्ही हा एक शब्द द्या की येणाऱ्या इलेक्शन मध्ये आनंद दादाच्या चारी पॅनलच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून देणार असं जर आश्वासन तुम्ही दिलं तर तुमच्या ज्या काही मागणी असतील त्या मागण्या शंभर टक्के मी त्या ठिकाणी येऊन पूर्ण करून असे मी आश्वासन ठामपणे तुम्हाला देतो. अशाप्रकारे त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, सोलापूर महानगरपालिका माजी महापौर विष्णू निकंबे, माजी नगरसेवक गणेश पुजारी ,महिला अध्यक्ष संगीताताई जोगदंड, सुरेखाताई घाडगे, नुतनताई गायकवाड , पी बी ग्रुप प्रमुख गौतम (महाराज) चंदनशिवे, दशरथ कसबे अविनाश भडकुंबे, सुखदेव इंगळे, भारत बाबरे,किरण साळवे, श्रीमंत जाधव, पिंटू डावरे, धम्मपाल मैंदर्गीकर, भीमा इंगळे,रंगा वाघमारे, गौतम नागटिळक, अमर सोनकांबळे, मनोज थोरात, रवी काकडे,नाना कापुरे, उमेश रणदिवे, विनय शिरसागर, आशिष पात्रे,प्रतीक चंदनशिवे, भीमा मस्के, अक्षय मस्के, आदित्य चंदनशिवे, राजाराम लोखंडे, प्रथमेश सुरवसे,रवी सय्यद, दाजी वाघमारे, संदीप रणदिवे, बालराज जाधव, दत्तात्रय धावारे,सुनील कांबळे, सागर वाघमारे, प्रेम रणदिवे, रोहन तळभंडारे, सिद्धांत तळभंडारे, संतोष चंदनशिवे, स्वप्निल पुजारी, यशवंत गायकवाड, अमोल कदम, ज्योतिर्लिंग करंडे असंख्य कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

