सोलापूर – संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांसाठी निवेदन देण्यात आले. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना २०२४२५ मधील या योजनेचे अनुदान अजूनही मिळालेले नाही, यासाठी आज शेतकऱ्यांसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. 2024 – 25 थकीत अनुदान लवकरात लवकर मिळावे, पावसामुळे झालेल्या फळबागांसाठी नुकसान भरपाई मिळावी तसेच थकीत असलेला पिक विमा लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळावा अन्यथा संभाजी ब्रिगेड शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून जन आंदोलन करेल असा इशारा संभाजी ब्रिगेड कडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला.
यावर्षी झालेल्या अतिरिक्त पावसामुळे शेतकऱ्यांच्या फळबागांचे पूर्णतः नुकसान झालेले आहे. तसेच शेतकऱ्यांना अधिक लावलेले निकष व तांत्रिक अडचणी यामुळे पिक विमा ही मिळत नाहीये.
अगोदरच शेतकरी कर्जबाजारी असताना पुन्हा या आसमानी संकटामुळे शेतकऱ्यांच्या फळबागांची नुकसान झाल्यामुळे शेतकरी भयानक अशा आर्थिक संकटात सापडलेला आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण जास्त असताना त्यात शासनही शेतकऱ्यांना आणखी अडचणीत आणत आहे. कृषी खात्यात चौकशी केली असता फळबाग लागवड योजनेसाठी मिळणारे अनुदान मिळत नाही म्हणाल्यावर कृषी खात्याकडे निधी उपलब्ध नसल्याचे सांगून बुडवा उडवी चे उत्तर दिले जात आहेत यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी ह्या वाढतच चाललेल्या आहेत.
या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले, महानगर प्रमुख श्री जगदाळे,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनलदास, वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष कदम, शहराध्यक्ष मनीषा कोळी, जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले, उद्योग आघाडी शहर अध्यक्ष संतोष सुरवसे,जिल्हा सचिव सिद्धाराम सावळे, शहर कार्याध्यक्ष सतीश वावरे व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

