विमुक्त जाती भटक्या जमाती विभागाच्या वतीने भव्य मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

विमुक्त जाती भटक्या जमाती विभागाच्या वतीने भव्य मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

सोलापूर – प्रभाग 22 सेटलमेंट येथील कै.भगवानराव गायकवाड यांच्या अंबाबाई मंदिरात विमुक्त जाती भटक्या जमाती शहर काँग्रेस विभागाच्या वतीने भव्य मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. हे शिबिर शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालय व दादाई बहुउद्देशीय समाज सेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केले. या शिबिराचे उद्घाटन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक लक्ष्मण जाधव यांच्या हस्ते करून करण्यात आले.

नेत्र शिबिरात एकूण 115 नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 23 ज्येष्ठ नागरिकांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे. 20 नागरिकांना अल्प दरात चष्मे देखील देण्यात आले.

यावेळी नेत्र तंत्रज्ञ महेश पवार, VJNT शहराध्यक्ष युवराज जाधव, संस्थेचे नारायण जाधव, माजी सरपंच सुनील जाधव, निशांत गायकवाड, रमेश जाधव, अनिल जाधव, संजय गायकवाडz अनिल गायकवाड, पप्पू गारे, परशुराम गायकवाड, ज्ञानेश्वर जाधव, गणेश जाधव, प्रवीण जाधव, निशांत हौसनूर, कुणाल गायकवाड, बजरंग गायकवाड, समीर विजापूरे, सुभाष वाघमारे, कमरोणिसा बागवान, चंदा काळे, मुमताज तांबोळी, सुनीता बेरा, विवेक जाधव, निलेश गायकवाड, सागर गायकवाड, लक्ष्मण जाधव आदि उपस्थित होते.

नेत्र तपासणी शिबिर यशस्वी करण्याकरिता शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालयाचे सहकाऱ्यांनी सहकार्य केले