“हर हर महादेव”च्या जयघोषात‎ ईच्छा भगवंताची‎ परिवाराकडून‎ पौष्टिक‎ सुगंधी दुधाचे वाटप

“हर हर महादेव”च्या जयघोषात‎ ईच्छा भगवंताची‎ परिवाराकडून‎ पौष्टिक‎ सुगंधी दुधाचे वाटप

सोलापूर‎ : हिंदू‎ धर्मातील‎ अत्यंत पवित्र,‎ आध्यात्मिक‎ आणि‎ भक्तिमय‎ पर्व महाशिवरात्री निमित्त ईच्छा‎ भगवंताची परिवार‎ यांच्या वतीने‎ उपवासधारक‎ भाविकांसाठी मसाला दुधाचे भव्य‎ वाटप करण्यात‎ आले. परिवाराचे‎ संस्थापक,‎ मार्गदर्शक व आधारस्तंभ‎ लक्ष्मण मामा‎ जाधव‎ यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर रेल्वे स्थानकासमोर तसेच शहरातील विविध‎ ठिकाणी हा सेवाभावी‎ उपक्रम‎ अत्यंत धार्मिक वातावरणात‎ पार‎ पडला पहाटेपासूनच‎ शहरातील विविध शिवमंदिरांमध्ये “ॐ नमः‎ शिवाय”चा‎ अखंड जप,‎ रुद्राभिषेक आणि‎ भजन-कीर्तन‎ सुरू होते. भगवान शंकराच्या पिंडीवर‎ बेलपत्र,‎ दूध,‎ दही व मध अर्पण‎ करत‎ भक्तांनी श्रद्धेने‎ अभिषेक केला.‎ दिवसभर उपवास,‎ जप,‎ ध्यान आणि शिवपूजन करून भाविकांनी अध्यात्मिक साधना केली.‎ संपूर्ण परिसर “हर‎ हर महादेव”च्या‎ जयघोषाने‎ दुमदुमून गेला होता.


यावेळी‎ प्रभाग‎ क्रमांक २२ चे भाजप‎ नगरसेवक‎ किसन जाधव‎ म्हणाले,‎ “महाशिवरात्री हा‎ भगवान‎ शंकर आणि‎ माता‎ पार्वती यांच्या‎ विवाहाचा‎ पवित्र‎ दिवस आहे. या‎ दिवशी उपवास,‎ जप, ध्यान आणि‎ शिवपूजन केल्याने‎ मनःशांती,‎ आध्यात्मिक‎ उन्नती व पापक्षालन होते.‎ शिवभक्तांची सेवा करणे‎ हीच‎ खरी‎ समाजसेवा‎ आहे.”‎ गेल्या‎ ४०‎ वर्षांपासून लक्ष्मण जाधव‎ यांच्या मार्गदर्शनाखाली‎ माजी नगरसेवक‎ नागेश‎ गायकवाड, अँड अनिल जाधव,‎ शिवाजी मामा‎ गायकवाड‎ आणि‎ ईच्छा‎ भगवंताची परिवाराची‎ ही‎ अखंड सेवा‎ साक्षात शिवशंभोच्या नावाने‎ सुरू असल्याचे त्यांनी‎ अभिमानाने‎ नमूद केले.‎

प्रति वर्षाप्रमाणे‎ यंदा‎ अधिक प्रमाणात‎ तब्बल‎ ७५१ लिटर‎ सुगंधी आणि पौष्टिक‎ दुधाचे वाटप‎ करण्यात‎ आले‎ असून‎ हजारो‎ शिवभक्तांनी या उपक्रमाचा‎ लाभ‎ घेतला. उपवासधारक‎ भाविकांची सोय लक्षात‎ घेऊन गरम व पौष्टिक मसाला‎ दुधाचे‎ वितरण करण्यात‎ आले.‎ ही सेवा पुढील‎ काळातही‎ अखंडपणे‎ सुरू‎ राहणार‎ असल्याचा विश्वास‎ नगरसेवक किसन‎ जाधव‎ यांनी व्यक्त केला.‎

या प्रसंगी‎ पंडित‎ शेटे, अमोल लकडे,‎ सिद्धाराम खजूरगी‎ अध्यक्ष,‎ शरण‎ मठ, नीलम‎ नगर,‎ शिवा‎ बंडगर, अल्ताफ‎ शेख,‎ चेतन‎ नागेश अण्णा‎ गायकवाड,‎ हरीश तेलगू,‎ निलेश‎ कांबळे, विनोद‎ भाऊजी गायकवाड, अँड‎ किरण‎ गायकवाड,‎ कार्तिक‎ जाधव, तन्मेष गायकवाड,‎ तेजस गायकवाड,‎ अजिंक्य जाधव,‎ आदेश‎ जाधव,‎ उमेश‎ जाधव,‎ सागर कांबळे,‎ अमोल‎ जगताप,‎ प्रथमेश‎ पवार, वसंत कांबळे,‎ महादेव‎ राठोड, आकाश‎ जाधव, संकल्प जगदाळे, ऋषी‎ येवले, गणेश‎ यालगी, संतोष‎ हुडको, सचिन आंगडीकर‎ आदी मान्यवर उपस्थित‎ होते. भक्ती, सेवा‎ आणि सांस्कृतिक परंपरेचा सुंदर‎ संगम घडविणारा‎ हा‎ उपक्रम‎ सोलापूरच्या‎ धार्मिक‎ एकात्मतेचे प्रेरणादायी प्रतीक ठरला.