सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबर दररोज पाणी देण्याचा निर्धार

सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबर दररोज पाणी देण्याचा निर्धार

सोलापूर – जनविकास क्रांतीसेनेच्या आयोजित निर्धार मेळाव्यात, सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबरच दररोज पाणी देण्याचा निर्धार जनविकास क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.


जनविकास क्रांतिसेनेच्या वतीने 19 नोव्हेंबर 2025 रोजी निर्धार मेळावा संस्थापक अध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या अध्यक्षतेखाली व ॲड. संतोष न्हावकर ॲड. शरद पाटील, ॲड. विक्रम कसबे व डॉ. राजेश फडकुले यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.


प्रारंभी मान्यवरांचे व उपस्थित नागरिक बंधू भगिनींचे स्वागत प्रा श्रीशैल वाघमोडे सर यांनी केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. निर्धार मेळाव्याचे प्रास्ताविक श्रीनिवास चिलवेरी यांनी केले.
त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे जन विकास क्रांतीसेनेच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.


आपल्या अध्यक्षीय भाषणात विष्णू कारमपुरी (महाराज) पुढे म्हणाले की, सोलापूरच्या विकासाबाबत आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षांनी प्रयत्न केला नाही. त्यामुळे सोलापूरची अवस्था अत्यंत विकास शून्य झाली आहे. म्हणून जनविकास क्रांती सेनेच्या वतीने सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबर दररोज पाणीपुरवठा करण्याचा निर्धार करण्यात येत आहे., अशी घोषणा संस्थापक अध्यक्ष यांनी केली. आणि घेतलेला निर्धार यशस्वी करण्यासाठी सर्व सोलापूरकरांनी आशीर्वाद व सहकार्य करावे असे आवाहन केले.
सदर निर्धार मेळाव्यात ॲड. संतोष न्हावकर, ॲड शरद पाटील, ॲड विक्रम कसबे, यांनी जनविकास क्रांतीसेनेच्या कार्याला शुभेच्छा देऊन, जनविकास क्रांतीसेना ही सोलापूर शहर व जिल्ह्यात क्रांती घडविल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त केला.


या निर्धार मेळाव्यात वरील मान्यवरांसह जनविकास क्रांती सेनेचे उपाध्यक्ष मंगेश श्रीखंडे, सचिव ॲड. मुनिनाथ कारमपुरी, खजिनदार विठ्ठल कुराडकर, सदस्य श्रीनिवास चिलवेरी, सदस्य रेखा आडकी, सदस्य, प्रशांत येमुल, अंगद जाधव आदी मान्यवरांसह प्रसाद जगताप, स्वाती शिंदे, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, पप्पू शेख, सोहेल शेख, सिद्धाराम दुलंगे, राधिका मीठ्ठा, सविता दासरी, पद्मा मॅकल, पद्मा गुंडला यांच्यासह नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक श्रीशैल वाघमोडे सर यांनी केले.


फोटो मॅटर
जनविकास क्रांतिसेनेच्या निर्धार मेळाव्या प्रसंगी बोलताना विष्णू कारमपुरी (महाराज) व व्यासपीठावर ॲड. संतोष न्हावकर, शरद पाटील व ॲड विक्रम कसबे दिसत आहेत.


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *