रामवाडीत विधानसभेचे उपाध्यक्ष तथा‎ सह‎ संपर्कप्रमुख‎ अण्णा बनसोडे‎ यांच्या‎ हस्ते सांस्कृतिक‎ भवन प्रकल्पाचा‎ शुभारंभ

रामवाडीत विधानसभेचे उपाध्यक्ष तथा‎ सह‎ संपर्कप्रमुख‎ अण्णा बनसोडे‎ यांच्या‎ हस्ते सांस्कृतिक‎ भवन प्रकल्पाचा‎ शुभारंभ

सोलापूर‎ :‎ रामवाडी‎ परिसरासाठी‎ विकासाचा‎ नवा‎ अध्याय‎ सुरू‎ झाला असून उपमुख्यमंत्री अजित पवार‎ ‎ यांच्या विशेष निधीतून तब्बल‎ १‎ कोटी रुपयांच्या दोन‎ महत्त्वाकांक्षी‎ सांस्कृतिक‎ प्रकल्पांची उभारणी‎ होत‎ आहे.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब‎ आंबेडकर‎ सांस्कृतिक भवन‎ व साहित्यरत्न‎ लोकशाहीर‎ अण्णाभाऊ‎ साठे‎ सांस्कृतिक भवन या‎ दोन भव्य योजनांचा शुभारंभ व‎ भूमिपूजन सोहळा‎ शुक्रवार, 28‎ नोव्हेंबर 2025 रोजी‎ सायंकाळी‎ 6.00 वा. पार पडणार‎ आहे. दरम्यान‎ डॉ.‎ बाबासाहेब आंबेडकर‎ सांस्कृतिक‎ भवनासाठी‎ ₹50 लाख, तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे‎ सांस्कृतिक भवनासाठी ₹50‎ लाख अशी भक्कम‎ आर्थिक‎ तरतूद करून‎ रामवाडी‎ परिसराला‎ कायमस्वरूपी‎ सांस्कृतिक दिशा‎ देण्याचा‎ मानस व्यक्त‎ करण्यात‎ आला आहे.

या महत्त्वपूर्ण विकासकामांचा‎ शुभारंभ विधानसभा‎ उपाध्यक्ष‎ ‎ अण्णासाहेब बनसोडे‎ यांच्या शुभहस्ते‎ होणार‎ असून‎ कार्यक्रमाचे ठिकाण‎ रामवाडी,‎ अंबाबाई मंदिराच्या पाठीमागे, प्रभाग‎ क्र.‎ 22 येथे निश्चित करण्यात आले‎ आहे.‎ स्थानिक‎ नागरिकांसाठी‎ हा‎ ऐतिहासिक‎ क्षण ठरणार‎ असून या सोहळ्यास किसन‎ जाधव,‎ प्रदेश‎ उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस‎ पार्टी व नागेश गायकवाड, कार्यसम्राट‎ नगरसेवक,‎ सोमपा, सोलापूर यांनी‎ मोठ्या संख्येने‎ उपस्थित राहण्याचे आवाहन‎ केले‎ आहे.‎