महापालिका निवडणुकीचे अर्ज काँग्रेस पक्षाने मोफत द्यावे 

महापालिका निवडणुकीचे अर्ज काँग्रेस पक्षाने मोफत द्यावे 

सोलापूर – महानगरपालिकेच्या निवडणुकीचे अर्ज काँग्रेस पक्षाने मोफत द्यावेत अशी मागणी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, निरीक्षक मोहन जोशी, खा.प्रणिती शिंदे यांच्याकडे काँग्रेसचे जेष्ठ नेते सुनील रसाळे यांनी केली आहे. 

गेली पन्नास वर्षे काँग्रेस पक्षामध्ये एक निष्ठेने काम करतो माझ्या बरोबरअनेक सहकारी निष्ठेने काम करीत आहे अनेक लोकांनी सुशीलकुमार शिंदे सत्तेवर असताना पक्षाबरोबर होते. परंतु सत्ता जाताच हे नेते सुशील कुमार शिंदे यांची आणि पक्षाची साथ सोडून पक्षांतर केले.

आज सामान्य कार्यकर्ता पक्षाबरोबर एकनिष्ठ असलेला दिसतो, पक्षाकडे सत्ता असताना आणि आज नसताना देखील त्यांची काही अपेक्षा दिसून येत नाही. देशामध्ये आणि राज्यांमध्य, शहरांमध्ये काँग्रेस पक्षच असला पाहिजे हेच विचार घेऊन सामान्य कार्यकर्ता काम करताना दिसून येतो. 

महापालिकेची निवडणूक म्हणजे कार्यकर्त्याची निवडणूक आहे सामान्य कार्यकर्ता पक्षाकडून मला उमेदवारी मिळेल याच आशेवर तो सतत पक्षाचे काम करीत असतो 20 – 25 वर्ष पक्षाचे एक निष्ठेने काम करत असलेले कार्यकर्ते आम्ही पाहिलेले आहेत.

पक्षाचे प्रचार पत्रक वाटण्यापासून ते बूथ कमिटी पर्यंत कुठल्याही आशेवर न राहता तो सतत नेत्याने सांगितलेले काम करीत असतो, त्याची एकच आशा असते पाच वर्षांमध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये मला कुठेतरी सेवेची संधी मिळेल. काँग्रेस पक्षाचे असे अनेक कार्यकर्ते आहेत जे आपल्या प्रपंचाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी लहान सहान कामे करीत असतात. 

पक्षाचे काम करीत असताना त्यांच्याकडे चहा पिण्यासाठी पैसे नसतात कार्यकर्ता हा पक्षाचा केंद्रबिंदू आहे म्हणून महापालिकेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना पक्षाकडून विनामूल्य फॉर्म भरून घ्यावा अशी मागणी माजी काँग्रेसचे जेष्ठ नेते सुनील रसाळे यांनी केली आहे.