सोलापूर – महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे सदस्य अतुल कुमार जाधव (घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रभाग क्र १ विभागीय क्रमांक २) रूट क्रमांक ८ या कर्मचाऱ्यांने बस डेपो समोर साफसफाई स्वच्छताचे काम करत असताना बॉबी चौक येथील रहिवासी सत्यभामा पांडुरंग कांबळे यांची पिशवी कचऱ्यात सापडली असता त्या पिशवीमध्ये आधार कार्ड, १ तोळे सोने व ४ हजार रोख रुपये असा ऐवज प्रामाणिकपणे त्यांच्या घरी जाऊन पोच केला.
प्रभागातील कर्मचाऱ्यांनी ही बाब अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले व सफाई कामगार नेते श्रीनिवास रामगल साहेब यांना सांगितली यावेळी ट्रेड युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागातील अतिरिक्त आयुक्त पवार मॅडम यांना सांगितली अतिरिक्त आयुक्त यांनी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शाब्बासकीची थाप मिळाली पाहिजे व त्यांचे कौतुक झाले पाहिजे या अनुषंगाने त्यांनी सोमपाचे कर्तव्यदक्ष आयुक्त डॉ.सचिन ओंबासे साहेब यांच्या हस्ते स्वच्छता दूत अतुल जाधव यांचा सत्कार करण्यात केला व गुणवंत कर्मचारी म्हणून त्यांना सर्टिफिकेट देण्याचे आयुक्त साहेब यांनी अतिरिक्त आयुक्त यांना सूचना केल्या.
यावेळी युनियनचे मार्गदर्शक इकबाल तडकल साहेब यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचारी हा प्रामाणिकपणे काम करत असून आताच्या काळामध्ये एक तोळे सोने व चार हजार रुपये प्रभागातील नागरिकाचे प्रामाणिकपणे परत करतो हा सोलापूर महानगरपालिकेचा अभिमान असल्याचे सांगून या कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असल्याचे सांगितले.
यावेळी ट्रेड युनियनच्या वतीने सफाई कामगार नेते श्रीनिवास रामगल साहेब, मार्गदर्शक इकबाल तडकल साहेब,कार्याध्यक्ष योहान कानेपागुलू, खजिनदार अरुण मेहेत्रे, व पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

