सोलापूर – मसिहा सामाजिक बहुद्देशीय संस्थेच्या वतीने, दरवर्षीप्रमाणे यंदाही 26/11 दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ आणि संविधान दिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.
दि. 26 नोव्हेंबर 2025 रोजी, मसिहा चौक, मोदी, सोलापूर येथे सकाळी 8.00 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत हे शिबिर पार पडले.
सोलापूर ब्लड बँक व मेडीकेअर ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
संस्थेमार्फत वर्षभरातील गरीब व गरजूंना विनामूल्य रक्तपिशव्या पुरविण्याची सेवा सातत्याने दिली जाते.
शिबिराचा शुभारंभ : शहीदांना पुष्पहार अर्पण
शिबिराचा शुभारंभ मा. नरसय्या आडम व नगरसेविका सौ. कामिनी आडम यांच्या हस्ते शहीदांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.
या कार्यक्रमाला श्रीमती श्रीदेवी फुलारे, सौ. वैष्णवी अंबादास करगुळे, श्री. श्रीकांत डांगे, अॅड. अनिल वासम, श्री. मारेप्पा कंपली यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
310 रक्तपिशव्या संकलित — नवा उच्चांक
संस्थेचे संस्थापक मा. अमित मंचले यांनी माहिती देताना सांगितले की, “यंदाच्या शिबिरात 310 रक्तपिशव्यांचे संकलन करून आम्ही नवा उच्चांक गाठला आहे. समाजाच्या या अद्वितीय प्रतिसादाबद्दल आम्ही ऋणी आहोत.”
यशस्वी शिबिरासाठी योगदान देणाऱ्यांचे आभार
शिबिर यशस्वी होण्यासाठी योगदान देणाऱ्या
सिद्राम साखरे, राजू मरेड्डी, सोनू भंडारी, राजू गोरे, सुरेश फरड, सुनील काडे, प्रमोद कुरकल्ली, विकास कमलापुरे, रवी भंडारे, टायसन जगले, संपत जंगम, सिमोन पोगुल, नाथन बुरले, गौतम जगले, मोनेश घंटे, अजय शिंदे, अक्षय भंडारे,
तसेच सोलापूर ब्लड बँक, मसिहा तरुण मंडळ, सहकारी मित्रवर्ग आणि सर्व रक्तदाते यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
मसिहा सामाजिक बहुद्देशीय संस्था हे रक्तदान शिबिर केवळ सेवा नाही तर शहीदांविषयी कृतज्ञतेची भावपूर्ण सलामी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

