सोलापूर – अकलूज नगर परिषदेसाठी येत्या 2 तारखेला मतदान होणार आहे. या निवडणुकीत सोलापूर शहर भारतीय जनता युवा मोर्चा पूर्ण ताकदीने मैदानात उतरला आहे.
प्रभाग क्रमांक 2, 4 आणि 5 मध्ये शहर भाजयुमो पदाधिकाऱ्यांनी घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधला. भारतीय जनता पार्टीचे ध्येय, आणि केलेली विकासकामे जनतेसमोर स्पष्टपणे मांडण्यात आली.

“भयमुक्त अकलूज – भ्रष्टाचारमुक्त अकलूज” हा संदेश मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचवण्यात आला.
अकलूजमधील व्यापारी, डॉक्टर, इंजिनिअर आणि महिला वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. युवकांच्या उत्साही प्रचारामुळे प्रभागांमध्ये सकारात्मक वातावरण तयार झाले आहे.

यावेळी भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.
अकलूजच्या विकासासाठी सक्षम, जबाबदार आणि जनतेशी जोडलेले नेतृत्व निवडले जाईल, आणी भारतीय जनता पार्टीचा अकलूज मधील पहिला नगराध्यक्ष जनतेतून निवडून येईल असा विश्वास आहे….!

यावेळी युवा मोर्चा शहराध्यक्ष विजय कुलथे, यतीराज होनमाने, विश्वनाथ प्याटी, योगेश कबाडे, गणेश पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते….!

