मुख्यमंत्री फडणवीस‎ यांनी‎ प्रभाग‎ २२ साठी‎ निधी‎ मंजूर केल्याबद्दल‎ भाजप उमेदवार किसन जाधव यांचे‎ जाहीर आभार

मुख्यमंत्री फडणवीस‎ यांनी‎ प्रभाग‎ २२ साठी‎ निधी‎ मंजूर केल्याबद्दल‎ भाजप उमेदवार किसन जाधव यांचे‎ जाहीर आभार

सोलापूर‎ – शहराच्या‎ विकासाच्या‎ दृष्टीने मुख्यमंत्री‎ देवेंद्र‎ फडणवीस यांनी दिलेली ग्वाही ही प्रभाग क्रमांक‎ २२‎ मधील नागरिकांसाठी‎ मोठी‎ आश्वासक‎ बाब‎ ठरली आहे. हरिभाई देवकरण प्रशालेच्या‎ मैदानावर‎ झालेल्या जाहीर सभेत‎ मुख्यमंत्री‎ फडणवीस यांनी रामवाडी, लिमयेवाडी,‎ विजापूर नाका‎ आणि‎ प्राणीसंग्रहालय‎ परिसरातील पायाभूत‎ सुविधा,‎ रस्ते,‎ पाणीपुरवठा आणि नागरी‎ सुविधांसाठी भरीव‎ निधी उपलब्ध‎ करून देण्याचा ठाम‎ शब्द‎ दिला.‎

या‎ घोषणेमुळे‎ प्रभाग २२‎ मधील विकासाला‎ नवे‎ बळ‎ मिळाले असून, नागरिकांमध्ये समाधानाची भावना‎ निर्माण झाली‎ आहे.‎ या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी‎ आमदार देवेंद्र‎ कोठे यांच्या माध्यमातून‎ सातत्याने‎ पाठपुरावा‎ करणारे‎ भाजपाचे‎ उमेदवार किसन जाधव‎ यांनी‎ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर‎ आभार मानले. मुख्यमंत्री जे बोलतात‎ ते करून दाखवतात.‎ देवेंद्र‎ फडणवीस‎ आणि देवेंद्र कोठे‎ यांच्या‎ नेतृत्वावर‎ आम्ही जो‎ विश्वास‎ ठेवला होता,‎ तो आज पूर्णपणे‎ सार्थ ठरला‎ आहे. त्यामुळे‎ आता‎ प्रभाग‎ २२‎ चा विकास‎ थांबणार‎ नाही,‎ तर वेगाने‎ पुढे जाणार आहे, असे‎ जाधव‎ म्हणाले. रामवाडी‎ व लिमयेवाडी भागातील रस्ते,‎ ड्रेनेज, पाणीपुरवठा‎ तसेच‎ विजापूर नाका‎ परिसरातील‎ मूलभूत‎ सुविधांच्या‎ कामांना‎ या निधीमुळे‎ गती मिळणार आहे.

विशेषतः‎ रोज‎ पाणीपुरवठ्याची‎ घोषणा‎ ही‎ नागरिकांसाठी मोठा‎ दिलासा‎ ठरणार असून, अनेक‎ वर्षांपासून‎ प्रलंबित असलेल्या‎ समस्यांवर तोडगा निघणार आहे.‎ महात्मा‎ गांधी‎ प्राणीसंग्रहालयाचा‎ स्वतंत्र विकास आराखडा‎ तयार असून, त्यासाठीही‎ आमदार कोठे यांच्या‎ प्रयत्नांना मुख्यमंत्री फडणवीस‎ यांनी‎ पाठबळ‎ दिले आहे.‎ केंद्रात‎ व राज्यात भाजपाची‎ सत्ता‎ असताना,‎ महापालिकेतही भाजपाची सत्ता‎ आल्यास‎ विकासकामे अधिक‎ वेगाने‎ आणि पारदर्शकपणे‎ होतील, असा‎ विश्वास यावेळी व्यक्त करण्यात‎ आला.‎ किसन‎ जाधव यांनी सांगितले की,‎ निवडून आल्यानंतर‎ उर्वरित‎ राहिलेली सर्व‎ कामे‎ प्राधान्याने पूर्ण‎ केली जातील आणि‎ प्रभागाच्या‎ शेवटच्या‎ टोकापर्यंत विकास‎ पोहोचवला जाईल.

मुख्यमंत्री फडणवीस‎ यांच्या‎ स्पष्ट भूमिकेमुळे‎ आणि आमदार‎ देवेंद्र‎ कोठे‎ यांच्या प्रभावी‎ नेतृत्वामुळे प्रभाग‎ २२ च्या नागरिकांना आता विकासाबाबत‎ ठाम‎ भरोसा‎ मिळाला‎ आहे.‎ या‎ निधीमुळे‎ परिसराचा चेहरामोहरा बदलणार‎ असून, भाजपाच्या माध्यमातूनच‎ प्रभागाचा‎ सर्वांगीण‎ विकास‎ साधला जाईल,‎ असा‎ ठाम विश्वास नागरिकांमध्ये‎ निर्माण‎ झाला आहे.‎