सोलापूर – हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त ठाकरे गटाच्या युवासेनेतर्फे सोलापूरातील श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गरीब व गरजू नागरिकांना सोमवारी ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. शहरात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या थंडीचा विचार करून हा उपक्रम राबवण्यात आला. युवासेनेचे शहर प्रमुख विठ्ठल वानकर यांच्या नेतृत्वाखाली हा सामाजिक उपक्रम पार पडला.
जवळपास 100 गरजूंना ब्लॅंकेटचं वाटप करण्यात आले. “बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिलेली शिकवण ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ आम्ही आजही जपतो. त्याच धर्तीवर हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आलेचे युवासेनेचे शहर प्रमुख विठ्ठल वानकर यांनी सांगितले.
या वेळी युवासेनेचे जिल्हा समन्वयक सुमित साळुंखे, शहर समन्वयक गुरुनाथ शिंदे, विभागप्रमुख अण्णा जाधव, अमर गुंड, अर्जुन गायकवाड, सागर जाधव, राहुल आवताडे, विष्णू जगताप, राजू बुरबुरे, संतोष कोरे, संदीप काशीद, अरविंद गवळी, साई जाधव, अनिल शिंदे आदी युवासेनाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

