सौ.भू.म.पुल्ली कन्या प्रशाला ,कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात साजरा

सौ.भू.म.पुल्ली कन्या प्रशाला ,कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात साजरा


सोलापूर – पद्मशाली शिक्षण संस्था संचलित, सौ.भू.म. पुल्ली कन्या प्रशाला ,कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन सोहळा हुतात्मा स्मृती मंदिर येथे अत्यंत उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. अश्विनी पाटील – पोलीस उपायुक्त(क्राईम ब्रँच) , पोलिस आयुक्तालय , सोलापूर यांच्या शुभहस्ते झाले, कार्यक्रमसाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. आनंदकुमार पाटकर- रिजनल मॅनेजर ,स्टेट बँक ऑफ इंडिया, सोलापूर रिजन यांची उपस्थिती होती तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव आदरणीय दशरथजी गोप हे होते . सर्व मान्यवरांच्या हस्ते नटराजाच्या मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली .


कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. ॲड.श्रीनिवास क्यातम , उपाध्यक्ष मा. प्रा. श्रीनिवास कोंडी ,खजिनदार मा. गोवर्धन कमटम , विश्वस्त मा. पांडुरंग दिड्डी , मा. श्रीधर चिट्याल , मा. नागनाथ गंजी, मा. नागनाथ श्रीरामदास, मा. मधुकर कट्टा, मा. गणेश गुज्जा तसेच कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाचे युवराज मेटे , उपप्राचार्य श्री. अनिल निंबाळकर, सौ.भू. म. पुल्ली कन्या प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाचे देणगीदार श्री. रामदास पुल्ली, प्राचार्या सौ.गीता सादूल, उपमुख्याध्यापक श्री. तुकाराम श्रीराम, पर्यवेक्षक श्री. परमेश्वर बाबळसुरे यांची व अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.


अध्यक्षीय मनोगतात मा.दशरथ गोप यांनी संस्थेच्या ११४ वर्षाच्या गौरवशाली परंपरेची माहिती दिली, बोर्ड परिक्षेतील गुणवंत विद्यार्थींनींचे कौतुक करत आमच्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील कन्या भविष्यात चूल आणि मूल याठिकाणी थांबणारे नाहीत तर स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी जीवन जगतील आणि मला खात्री आहे की प्रसंग आल्यास आपल्या आई वडिलांचे पालन कर्ता होण्यास देखील ते सक्षम आहेत अशी आर्त भावना व्यक्त केली . स्नेहसंमेलनात सहभागी विद्यार्थीनी कलाकारांना शुभेच्छा दिल्या.


कार्यक्रमाचे उद्घाटक मा. अश्विनी पाटील यांनी आपल्या मनोगतातून सायबर क्राईम व सोशल मीडिया विषयी माहिती सांगितली . महिलांनी स्वावलंबी बनणे आजच्या जगात अत्यंत महत्त्वाचे आहे तसेच या जगात आपले स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी जिद्द चिकाटी असणे महत्त्वाचे आहे असे सांगितले.


प्रमुख पाहुणे मा.आनंदकुमार पाटकर यांनी आपल्या मनोगतातून कॉलेज जीवनातील पाच वर्ष अत्यंत महत्त्वाचे आहेत ती आपल्या जीवनाची दिशा ठरवतात. आई-वडिलांचा आदर करा. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करा. मोबाईल पासून दूर रहा ,श्रम केले तर आपण उच्चस्थानी पोहोचतो , वेळेचा सदुपयोग करा असे सांगितले
उपप्राचार्य बाळकृष्ण गोटीपामूल यांनी स्वागत, प्रस्तावना व अहवाल वाचन करताना महाविद्यालयातील विविध उपक्रम व शैक्षणिक गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा याबद्दल माहिती दिली महाविद्यालयातील मुलींच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि मुलींचे कौशल्य विकसित व्हावे व विद्यार्थिनींना प्रेरणा मिळावी यासाठी पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलनाचे आयोजन केल्याचे सांगितले.


कला विभाग व वाणिज्य विभागातील इयत्ता- बारावी फेब्रु/मार्च २०२५ बोर्ड परीक्षेत महाविद्यालयातून व विषयातून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थिनींना व महाविद्यालयात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील बक्षीस पात्र विद्यार्थिनींना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.


स्नेहसंमेलनात एकूण २२९ विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. कोळी नृत्य, गोंधळ गीत, तेलुगु गीत, देवी गीत, लोकगीत, लावणी, जूने अजरामर गीते, भारुड, हिंदी रिमिक्स, मूकनाट्य, कपल डान्स , आदी गीतांवर सुंदर व बहारदार नृत्य सादर केले.

याप्रसंगी महाविद्यालयातील आदर्श वर्ग व आदर्श विद्यार्थींनींचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. स्नेहसंमेलनात परीक्षकामार्फत प्रथम, द्वितीय ,व तृतीय क्रमांक काढण्यात आले व संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.
विद्यार्थिनींनी आणि माता पालकांनी संपूर्ण सभागृह भरून गेले. बक्षीस पात्र विद्यार्थिनींची यादी वाचन कुमार सोलनकर यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय सुमित्रा कुडक्याल यांनी केला.

सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. चंद्रकांत करपे व सौ. सुजाता विन्नू यांनी सूत्रसंचालन केले. अपर्णा लकशेट्टी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख चंद्रकांत करपे , बक्षीस वितरण प्रमुख लकशेट्टी अपर्णा तसेच श्री.करणकोट , सोलनकर , सौ.शेख , नामपल्ली , सौ.अभंग , बंडगर , करै, सौ.मिठ्ठापल्ली , सौ.कुसेकर , अंबादास रच्चा, पठाण, मिरजकर, बिराजदार, सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. स्नेहसंमेलनासाठी परिक्षक म्हणून माजी उपप्रचार्य श्री गोपाळ मुडदिड्डी व सौ.दास मॅडम यांनी काम पाहिले.