सोलापूर – महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आणि अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे सोलापूरचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांची शुक्रवारच्या दौऱ्याची सुरुवात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या अभिवादनाने झाली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून अण्णाभाऊ साठे यांचा दौरा प्रभाग क्रमांक ६ मध्ये सुरू झाला. या भागात अण्णा बनसोडे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
अमराई दमाणी नगर भागातील लखन भंडारे व विशाल बंगाळे अप्पासाहेब बंगाळे देगाव भागातील सलीम नदाफ यांच्या भागात त्यांनी सदिच्छा भेट देऊन कार्यकर्त्यांना आगामी सोलापूर महानगरपालिकेसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आयोजित केला होता आणि कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव,आनंद चंदनशिवे, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, श्यामवराव गांगर्डे, महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर, चित्रा कदम , माजी नगरसेविका नूतन गायकवाड , माजी नगरसेवक गणेश पुजारी, चंद्रकांत सोनवणे , अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अमीर शेख,वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, शहर सचिव दत्तात्रय बनसोडे सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे आदी उपस्थित होते.

