ईच्छा‎ भगवंताची‎ परिवाराकडून अण्णा‎ बनसोडे‎ यांचा सन्मान

ईच्छा‎ भगवंताची‎ परिवाराकडून अण्णा‎ बनसोडे‎ यांचा सन्मान

सोलापूर – विकासाच्या‎ नव्या दिशेची सुरूवात;‎ ‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून‎ अण्णा‎ बनसोडे‎ यांचा‎ सन्मान‎ नागपूर‎ हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर‎ सोलापुरातील पाणीपुरवठा, रोजगार,‎ औद्योगिक वाढ‎ व पायाभूत सुविधा‎ यांसारख्या प्रमुख‎ प्रश्नांवर‎ सर्वपक्षीय‎ बैठकीचे आयोजन‎ विधानसभेचे उपाध्यक्ष व‎ सोलापूर‎ जिल्ह्याचे सहसंपर्क मंत्री अण्णा‎ बनसोडे‎ यांनी केले.‎

या‎ बैठकीस‎ राष्ट्रवादी‎ काँग्रेस‎ पक्षाचे‎ संतोष भाऊ पवार, जुबेर‎ बागवान, प्रदेश उपाध्यक्ष‎ किसन‎ जाधव, ज्येष्ठ नेते तौफिक‎ शेख,‎ माजी नगरसेवक आनंद‎ चंदनशिवे, गणेश‎ पुजारी,‎ आनंद मुस्तारे,‎ प्रमोद भोसले, प्रदेश सचिव‎ इरफान‎ शेख, सलीम पामा, तुषार जक्का,‎ अनिल‎ बनसोडे,‎ शबाज‎ किंग,रुपेश भोसले,वैभव गंगणे,हुलगप्पा शासम,आनंद‎ गाडेकर‎ यांच्यासह मनपा‎ व‎ जिल्हा प्रशासन तसेच पोलीस‎ विभागातील वरिष्ठ अधिकारी‎ तसेच सोलापुरातील‎ पत्रकार बांधव उपस्थित होते.

शहराच्या‎ समस्यांवर सखोल चर्चा‎ होऊन‎ संबंधित‎ अधिकाऱ्यांना त्वरित‎ उपाययोजनांचे‎ निर्देश‎ अण्णा‎ बनसोडे यांनी‎ दिले. सोलापूरच्या‎ तीन‎ दिवसीय‎ दौऱ्यात‎ पाहिलेल्या‎ समस्या आणि नागरिकांच्या अपेक्षांच्या‎ आधारे त्यांनी सर्वांगीण विकासाची‎ भूमिकाही‎ स्पष्ट केली.‎ या‎ पार्श्वभूमीवर‎ किसन‎ जाधव‎ यांनी‎ ‘ईच्छा‎ भगवंताची’ परिवाराच्या‎ वतीने अण्णा‎ बनसोडे‎ यांचा‎ विशेष सन्मान‎ केला.

तथागत गौतम बुद्ध,‎ डॉ.‎ बाबासाहेब आंबेडकर, उपमुख्यमंत्री‎ अजित पवार, खासदार सुनील‎ तटकरे‎ आणि अण्णा‎ बनसोडे‎ यांची छायाचित्र असलेले‎ एकत्र प्रतिमा असलेली फ्रेम‎ देऊन त्यांना गौरवण्यात‎ आले. किसन जाधव‎ यांनी‎ सांगितले‎ की,‎ पिंपरी-चिंचवडच्या‎ धर्तीवर‎ सोलापूरचा‎ विकास करण्याचा अण्णा‎ बनसोडे‎ यांचा मानस शहरासाठी आश्वासक असून‎ त्यांच्या‎ विकासदृष्टिकोनाला‎ पूर्ण‎ पाठिंबा देऊ.‎ सोलापूरच्या सर्वांगीण‎ प्रगतीसाठी ही बैठक‎ आणि दिलेला सन्मान महत्त्वाचा‎ टप्पा ठरल्याचे उपस्थितांनी‎ नमूद केले.