अण्णा बनसोडे आणि आ.विजयकुमार देशमुख यांचा एकाच गाडीमधून प्रवास

अण्णा बनसोडे आणि आ.विजयकुमार देशमुख यांचा एकाच गाडीमधून प्रवास

सोलापूर – विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आणि शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांचा गाडीमध्ये शुक्रवारी दुपारी एकत्र प्रवास केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.


अण्णा बनसोडे तीन दिवस सोलापूर दौऱ्यावर आहेत.या दौऱ्यात त्यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत.शुक्रवारी सोलापुरातील मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेत असतानाच वाटेत अण्णा बनसोडे यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांना सोबत घेतले आणि काही वेळ सोबत प्रवास केला.
यावेळी गाडीमध्ये गप्पाटप्पा रंगल्या आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.


यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे सोबत होते. सर्वांनी एकत्र गाडीतच सेल्फीसुद्धा घेतला.