अल्पसंख्यांक समाजाला अजित पवार यांनी राज्यात न्याय दिला : अण्णा बनसोडे

अल्पसंख्यांक समाजाला अजित पवार यांनी राज्यात न्याय दिला : अण्णा बनसोडे

सोलापूर – राज्यात विविध पदावर अल्पसंख्यांक समाजाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी न्याय दिला आहे. तसेच हसन मुश्रीफ आणि इद्रिस नाईकवाडी यांना मंत्रिमंडळात आणि विधान परिषदेत मोठी संधी दिली आहे. भाजपात राहून सुद्धा अजितदादा पवार सातत्याने मुस्लिम समाजाची बाजू घेतात.त्यामुळे मुस्लिम समाजाने आगामी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे,असे आवाहन राष्ट्रवादीचे सहसंपर्क मंत्री यांना बनसोडे यांनी केले. प्रभाग क्रमांक ८ आणि १४ संदर्भात गुरुवारी सायंकाळी भारतीय चौकात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत प्रसंगी मार्गदर्शन करताना सहसंपर्क मंत्री बनसोडे बोलत होते.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर पुढे जात आहे. सोलापुरात जुबेर बागवान यांच्या घरात कोणत्याही प्रकारचा राजकीय वारसा नसताना सुद्धा त्यांना युवक अध्यक्ष, जिल्हा नियोजन समिती तसेच विधानसभेची उमेदवारी देण्यात आली.सध्या ते राष्ट्रवादी पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.अल्पसंख्यांक समाजासाठी ही अभिमानाची बाब असल्याचेही अण्णा बनसोडे यावेळी बोलताना म्हणाले.


या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार,प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, आनंद चंदनशिवे, शहाबाद मुतवल्ली, सेंट्रल हॉस्पिटलचे अध्यक्ष सोहेल पटेल, युवा नेते नजीब शेख, पप्पू अड्डेवाले यांच्यासह मुस्लिम समाजातील युवक कार्यकर्ते, नागरिक आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.