प्रभाग‎ २२‎ मध्ये‎ विकासाची‎ गंगा!‎ आमदारांच्या शब्दपूर्तीतून‎ रस्ता‎ कामाचा‎ दमदार‎ शुभारंभ

प्रभाग‎ २२‎ मध्ये‎ विकासाची‎ गंगा!‎ आमदारांच्या शब्दपूर्तीतून‎ रस्ता‎ कामाचा‎ दमदार‎ शुभारंभ

सोलापूर -‎ महानगरपालिका‎ नागरी दलितेतर‎ योजनेअंतर्गत‎ प्रभाग‎ क्रमांक २२ बुवा‎ गल्ली‎ मध्ये‎ तब्बल‎ ₹१४ लाख‎ १८ हजार‎ ४९२ रुपयांच्या खर्चातून‎ रस्ता कामाचा‎ शुभारंभ उत्साहात पार पडला. या कामाच्या‎ निमित्ताने प्रभागातील‎ नागरिकांमध्ये‎ समाधान आणि‎ आनंदाचे वातावरण पाहायला‎ मिळाले. नुकतेच‎ निवडणुकीच्या प्रचारार्थ‎ सोलापूर हरीभाई‎ देवकरण प्रशालेच्या‎ प्रांगणामध्ये झालेल्या‎ जाहीर‎ सभेत‎ मुख्यमंत्री‎ देवेंद्र फडणवीस‎ यांनी‎ यांनी प्रभाग‎ २२‎ मधील विकासासाठी‎ महत्त्वाची घोषणा केली होती,‎ आज‎ त्या शब्दाची‎ पूर्तता‎ करत‎ त्यांनी‎ विकासाच्या नव्या‎ पर्वाची सुरुवात‎ झाली‎ आहे. जोपर्यंत‎ सोलापूर शहराला दररोज पाणीपुरवठा‎ होत नाही, तोपर्यंत मी‎ डोक्यावर फेटा बांधणार‎ नाही,‎ अशी‎ भूमिका‎ घेणारे सोलापूर‎ शहर‎ मध्य‎ विधानसभा‎ मतदारसंघाचे आमदार‎ देवेंद्र‎ कोठे हे‎ खऱ्या‎ अर्थाने जनतेचे सक्षम आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व असल्याची‎ भावना‎ नगरसेवक किसन जाधव यांनी‎ व्यक्त केली. माजी नगरसेवक‎ नागेश‎ अण्णा‎ गायकवाड‎ यांच्या सहकार्याने आणि‎ विद्यमान‎ नगरसेवक दत्तात्रय नडगिरी,‎ चैत्रालीताई शिवराज‎ गायकवाड‎ व अंबिकाताई‎ नागेश‎ गायकवाड‎ यांच्या प्रयत्नातून‎ हा विकासप्रकल्प‎ साकार झाला.‎ प्रभाग २२‎ चे‎ नगरसेवक‎ किसन जाधव‎ यांनी‎ आपल्या मनोगतात सांगितले‎ की,‎ देवेंद्र‎ कोठे यांचे कार्य आणि‎ विकासात्मक‎ धोरणे प्रभागासाठी‎ मोलाची‎ ठरत‎ आहेत.‎ त्यांच्या‎ नेतृत्वामुळे‎ प्रभाग २२‎ चा विकास‎ आता कोणत्याही‎ परिस्थितीत‎ थांबणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र‎ चव्हाण‎ पालकमंत्री जयकुमार गोरे,‎ सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे तरुण तडफदार‎ युवा आमदार देवेंद्र कोठे‎ यांच्या नेतृत्वाखाली आणि सहकार्याने प्रभाग २२ च्या विकासाचा‎ वेग‎ अधिक‎ वाढवण्याचा‎ निर्धार व्यक्त करण्यात आला. प्रभाग‎ २२ मध्ये‎ आता‎ केवळ‎ आश्वासने‎ नाहीत,‎ तर‎ कृतीतून‎ विकास दिसत आहे. हा शुभारंभ म्हणजे आगामी‎ काळातील सर्वांगीण‎ प्रगतीचा‎ नांदीघोष ठरला आहे.‎ या‎ रस्ता काम‎ शुभारंभ प्रसंगी नारायण मामा‎ कांबळे,‎ दत्ता‎ मामा‎ जाधव,‎ शिवाजी कांबळे, सुरेश‎ मामा टेळे, अजित‎ लकडे,‎ बाळासाहेब‎ वाघमारे, शिवाजी‎ इरकर, पवन‎ खांडेकर, महालिंग जाधव, प्रकाश केकडे,‎ अमोल‎ भाऊ‎ जगताप, देविदास जगताप‎ मामा‎ महाराज,‎ कुमा मामी‎ लकडे, भागाताई पाटणकर, शारदाताई‎ जगताप,‎ मोरे मावशी, शुभांगी ताई लकडे, गंगू मावशी जरग,‎ संगीता‎ ताई सरवदे,गंगोताई कांबळे, वनिता‎ ताई पाटील,‎ पूजाताई‎ पाटणकर,‎ कल्पनाताई‎ चोरगे, इरकर ताई, खंडागळे‎ ताई, अनिताताई जाधव आदींची प्रमुख‎ उपस्थिती होती