अजितदादांच्या दिमतीला वकीलांची मोठी फौज

अजितदादांच्या दिमतीला वकीलांची मोठी फौज

सोलापूर – अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये वर्षानुवर्षे लीगल सेल कार्यरत आहे. राष्ट्रवादीचे शहर – जिल्हा अध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्यावर तसेच त्यांच्या कार्यावर आणि पक्ष नेतृत्वावर म्हणजेच अजितदादा पवार यांच्यावर विश्वास ठेवत अनेक वर्षापासून वकील बांधव अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे कामकाज निष्ठेने पार पाडत आहेत.

तीन दिवसाच्या सोलापूर दौऱ्यावर आलेले विधानसभेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांच्यासाठी आणि राष्ट्रवादी पक्षासाठी शुक्रवारचा दिवस अत्यंत लकी ठरला, असं म्हणायला हरकत नाही. सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात झालेल्या लीगल सेलच्या बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणावर वकील बंधू आणि भगिनींचा सहभाग हा सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी निश्चितच बळ देणारा ठरला आहे.

लीगल सेलचे प्रमुख जयकुमार भंडारे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत अण्णा बनसोडे यांनी विधी अधिकाऱ्यांसमवेत संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सामान्य कार्यकर्ते तसेच अन्य पक्षातून अजितदादा पवार यांच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी पक्षामध्ये काम करू इच्छिणाऱ्यांची संख्या एकीकडे कमालीची वाढत असतानाच न्याय व्यवस्थेत काम करणाऱ्या वकील मंडळींनीसुद्धा अजितदादा पवार यांच्या कार्याला बळ दिले आहे. जवळपास २५ हून अधिक निष्णात वकील मंडळींनी अण्णा बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला असून त्यांना शासकीय विश्रामगृहात एका कार्यक्रमात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे.

अजितदादा पवार यांच्या कार्यावर निष्ठा ठेवून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला असून आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये वकील बांधव किंवा भगिनी सुद्धा नगरसेवक म्हणून निश्चित नेतृत्व करतील असा विश्वास वकील मंडळींनी यावेळी बोलताना व्यक्त केला.वकील मंडळींच्या राष्ट्रवादी पक्षामधील इतक्या मोठ्या सहभागामुळे अण्णा बनसोडे सुद्धा अवाक झाले.सोलापुरातील राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केलेल्या या सर्व वकील बंधू भगिनींच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून वकील बांधवांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य देणार असल्याचे अण्णा बनसोडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.


याप्रसंगी लिगल सेलचे अध्यक्ष अॅड. जयप्रकाश भंडारे, कार्याध्यक्ष अॅड. दादासाहेब जाधव, सेक्रटरी अॅड. राजेंद्र चव्हाण, अॅड.शाहीन शेख, अॅड करण भोसले, अॅड. शिवाजी कांबळे, अॅङसुप्रिया मखरे, अॅड राजकुमार पाटील, अॅड.पोर्णिमा शंखे, अॅड. मेघना मलपेद्दी, अॅड. एम.बी. ऐवळे, अॅड, विक्रम वडगावकर, अॅड. नम्रता तुपदौरु, अॅड. राहुल गायकवाड, अॅड. शशांका जाधव, अॅङ रामेश्वर हरके, अॅड. श्वेता वाघमारे, अॅड, पोर्णिमा खंडी, या वकील मंडळींनी प्रवेश केला व त्यांना पद नियुक्तीचे पत्र देण्यात आले.त्यांना अण्णा बनसोडे यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादीचे शहर – जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे ,प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर, विद्यार्थी अध्यक्ष अनिकेत व्हसुरे,मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेहराज आबादीराजे, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख,शहर सचिव दत्तात्रय बनसोडे, प्रज्ञासागर गायकवाड , अर्चंना दुलंगे , सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.