सोलापूर – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणाऱ्या अंडर 23 महिला निवड चाचणी कॅम्प साठी सोलापूर च्या भक्ती पवार ,स्नेहा शिंदे,अमृता गव्हाणे व आर्या उमाप यांची निवड करण्यात आली आहे.
मागील आठवड्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कडून घेण्यात आलेल्या टी20 निमंत्रित सामन्यांमध्ये उल्लेखनीय ककामगिरी केल्यामुळे ही निवड करण्यात आली आहे.
निमंत्रित सामन्यांमध्ये सोलापूर संघाकडून खेळताना 5 टी20 सामन्यात भक्ती पवार 10 विकेट,स्नेहा शिंदे 8 विकेट,अमृता गव्हाणे 6 विकेट व आर्या उमाप 211 धावा अशी कामगिरी केली. हा निवड चाचणी कॅम्प पुणे या ठिकाणी एक महिना चालणार आहे.
या निवडीबद्दल स्नेहल जाधव, किरण मणियार, सारिका कुरुलकर, मानसी जाधव यांनी अभिनंदन केले.
या निवडीबद्दल सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष दिलीप माने, चेअरमन रणजित सिंह मोहिते पाटील, व्हा. चेअरमन श्रीकांत मोरे, तसेच उपाध्यक्ष प्रकाश भुतडा, मुकुंद जाधव, नितीन देशमुख व संयुक्त सेक्रेटरी धैर्यशील मोहिते पाटील आणि चंद्रकांत रेंबर्सु सर व कार्यकरणी सदस्यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
