सोलापूर – सोलापूरकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भ्रष्ट साखळीचा पर्दाफाश करण्यासाठी गेल्या २ दिवसांपासून नगरसेवक अक्षय अंजिखने शहरातील प्रमुख रस्त्यांवर रात्रीच्या वेळी स्वतः रस्त्यावर उतरून पाहणी करत होते. ऐन गणेशोत्सवानंतर शहरात स्वच्छतेची सर्वाधिक गरज असताना, मनपा प्रशासन आणि आऊटसोर्सिंग कंत्राटदाराची धक्कादायक लुटालूट मध्यरात्री ३ वाजेपर्यंत केलेल्या ‘Surprise Raid’ मध्ये उघडी पडली आहे!
सात रस्ता, VIP रोड, पार्क चौक, सिद्धेश्वर मंदिर, पंचकट्टा, अशोक चौक आणि गुरुनानक चौक या शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रमुख रस्त्यांवर प्रत्यक्ष जाऊन मध्यरात्री ३ वाजेपर्यंत स्वच्छतेच्या कामांची कसून पाहणी केली असता
१) कचरा संकलनासाठी मंजूर असलेले ट्रॅक्टर आणि आऊटसोर्सिंग कर्मचारी गेल्या ४ दिवसांपासून गायब होते!
२) रस्त्यावरील धूळ कमी करण्यासाठी आणि फूटपाथ धुण्यासाठी केंद्र सरकारने सोलापूर शहराला ४ अत्याधुनिक स्वीपर मशीन गाड्या दिल्या आहेत. मात्र, पाणी न मारता, फूटपाथ न धुता केवळ ‘बनावटी काम’ (कोरे झाडकाम) करून जनतेच्या पैशांची होणारी उधळपट्टी आणि हलगर्जीपणा मी जागेवर पकडला.
३) नियंत्रण अधिकारी तथा उपायुक्त शशिकांत भोसले यांना या चोरीची माहितीच नव्हती, तर आरोग्य निरीक्षक नदीमेटला यांनी कर्मचारी गायब असल्याची कबुली ऑन-कॅमेरा दिली आहे!

आयुक्तांचे चौकशीचे आदेश!
हा सर्व डिजिटल आणि कागदोपत्री पुरावा घेऊन नगरसेवक अक्षय अंजिखने यांनी आयुक्त यांची भेट घेतली. रात्री ३ वाजेपर्यंतचे व्हिडिओ पुरावे पाहिल्यानंतर आयुक्त यांनी तातडीने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच “शहराच्या स्वच्छतेबाबत प्रशासनाचा आणि कंत्राटदाराचा असा हलगर्जीपणा सोलापूर शहरात कधीही खपवून घेतला जाणार नाही,” असा कडक इशारा दिला आहे.
या आहेत प्रमुख मागण्या
- संबंधित भ्रष्ट आऊटसोर्सिंग कंत्राटदाराला तात्काळ काळ्या यादीत (Blacklist) टाकावे.
- चालू महिन्याचे त्याचे बिल रोखून महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी فौजदारी गुन्हा (FIR) दाखल करावा.
- कंत्राटदाराला पाठीशी घालणाऱ्या आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची (Suspension) कारवाई व्हावी.
हा लढा सोलापूर शहराच्या स्वास्थ्यासाठी, स्वाभिमानासाठी आणि पारदर्शकतेसाठी आहे. सोलापूरकरांच्या हक्काच्या पैशांवर दरोडा टाकणाऱ्या एकाही भ्रष्टाचाऱ्याला सोडणार नाही!
जय हिंद, जय महाराष्ट्र!
– अक्षय अंजिखाने
