सोलापूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या (पीबी ग्रुप) वतीने भव्य लेझीम ताफ्यासह शिस्तबद्ध आणि दिमाखदार मिरवणूक काढण्यात आली. आकर्षक सजावटीसह तथागत गौतम बुद्ध आणि बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींचा मनोहारी देखावा मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी लेझीमचे डाव खेळले. हजारो गणवेशधारी कार्यकर्त्यांनी सादर केलेल्या लेझीमच्या बहारदार खेळाने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले.

तथागत गौतम बुद्ध आणि विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तींचे पूजन पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून मिरवणुकीला उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब गायकवाड , राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, माजी नगरसेवक गणेश पुजारी, सीए सुशील बंदपट्टे, उमर शेख, पी.बी. ग्रुपचे प्रमुख गौतम चंदनशिवे, प्रतीक चंदनशिवे, एस. के. फाउंडेशनचे रविकांत कोळेकर, ॲड. विशाल मस्के, पी.बी. ग्रुपचे अध्यक्ष प्रवीण शिंदे, विश्वनाथ बिडवे, धम्मपाल मैंदर्गीकर आणि चंद्रकांत सोनवणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली ही मिरवणूक काढण्यात आली.
गणवेशातील हजारो कार्यकर्त्यांनी एकसुरात आणि तालबद्ध पद्धतीने लेझीमचा खेळ सादर केला. विशेष म्हणजे आनंद चंदनशिवे आणि गणेश पुजारी यांनीही कार्यकर्त्यांसोबत लेझीमचा डाव खेळत मिरवणुकीत रंगत आणली. शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडलेल्या या मिरवणुकीतून बुद्ध-भीम विचारांचा जागर करण्यात आला.
यावेळी मनोज थोरात, अनिष सय्यद, गोपीनाथ जाधव, संजय इंगळे, आदित्य चंदनशिवे,विनायक मस्के,अभिजीत कापुरे, अक्षय मस्के, लखन चंदनशिवे, अमित माने, अजय इंगळे, बाबा गायकवाड, बंटी सरवदे आणि संतोष चंदनशिवे, गौतम शिंदे,सतीश अडाकुल, अनिल ठोबरे,प्रथमेश इंगळे, अमर सुरवसे पिंटू वाघमोडे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मिरवणुकीतून बुद्ध-भीम विचारांचा संदेश : आनंद चंदनशिवे
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीतून तथागत गौतम बुद्धांच्या शांती आणि अहिंसेच्या धम्माचा संदेश देण्यात आला. या मिरवणुकीत सर्व जाती-धर्मांतील नागरिक सहभागी होतात. आज जगाला तथागत बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची नितांत गरज आहे, अशी भावना मंडळाचे मार्गदर्शक आनंद चंदनशिवे यांनी व्यक्त केली.
देवी मातेचे दर्शन घेत धार्मिक सहिष्णुतेचा संदेश ; ॲम्बुलन्सला तातडीने दिली वाट
भागवत थिएटरसमोर प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचा लेझीम ताफा सुरू असताना बाजूने आझाद हिंद चौक नवरात्र महोत्सव मंडळाची देवी मातेची मूर्ती पुढे जात होती. त्यावेळी आनंद चंदनशिवे आणि गणेश पुजारी यांनी देवी मातेचे मनोभावे दर्शन घेतले. धार्मिक सहिष्णुता आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश देण्यात आला. दरम्यान, मिरवणुकीदरम्यान अचानक आलेल्या ॲम्बुलन्सलाही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तातडीने वाट मोकळी करून दिली.
