सोलापूर – ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’चा बुलंद नारा देत भाजप-शिवसेना महायुतीच्या वतीने प्रभाग क्रमांक ३ मध्ये काढण्यात आलेल्या भव्य दुचाकी रॅलीच्या माध्यमातून माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी पुन्हा एकदा आपली संघटनात्मक ताकद दाखवून दिली. शेकडो दुचाकीस्वारांचा उत्स्फूर्त सहभाग, युवकांचा प्रचंड उत्साह आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती यामुळे ही रॅली केवळ आंदोलनापुरती मर्यादित न राहता शहर उत्तरमधील सुरेश पाटील यांच्या राजकीय ताकदीचे प्रभावी प्रदर्शन ठरली.
शहर उत्तरच्या राजकारणात सुरेश पाटील यांचे युवकांशी असलेले घट्ट नाते आणि कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन ही त्यांची जमेची बाजू मानली जाते. वर्षानुवर्षे जपलेला जनसंपर्क, युवकांची भक्कम फळी आणि विविध वसाहतींमध्ये निर्माण केलेले कार्यकर्त्यांचे जाळे याची प्रचिती या रॅलीच्या निमित्ताने पुन्हा आली. विशेष म्हणजे, युवकांना एकत्र आणण्याची आणि त्यांच्यात संघटनात्मक ऊर्जा निर्माण करण्याची त्यांची क्षमता या रॅलीतून ठळकपणे दिसून आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच सोलापूरचे दमदार आमदार देवेंद्र दादा कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. माजी नगरसेवक सुरेश पाटील आणि बाबुराव जमादार यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सायंकाळी चार वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅलीला उत्साहात प्रारंभ झाला. महात्मा बसवेश्वर महाराज चौक येथे रॅलीची सांगता झाली. बिपीन पाटील आणि उमेश जमादार यांनी रॅलीच्या नियोजनाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली.
हातात राष्ट्रध्वज, दुचाकींवर फडकणारे ध्वज आणि ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या रॅलीत घोंगडे वस्ती, मड्डी वस्ती, भवानी पेठ, इंदिरा वसाहत आणि जोडभावी पेठ परिसरातील युवक, कार्यकर्ते आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. या रॅलीने सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहर उत्तरमध्ये युवकांचे संघटन किती मजबूत आहे, याचा राजकीय संदेश दिला. केवळ निवडणुकीपुरते नव्हे, तर विविध सामाजिक आणि राजकीय उपक्रमांत सक्रिय राहणारी कार्यकर्त्यांची फळी हीच आपली खरी ताकद असल्याचे या निमित्ताने अधोरेखित झाले.
बाबुराव जमादार यांची समर्थ साथ आणि युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे रॅलीला विशेष रंगत आली यावेळी विनायक पाटील, मुदका करली, शिवा मंदकल, रवी कावळे, पप्पू जोशी, दीपक दुधाळे, व्यंकटेश जाटगल, विजय कोळी, विकी जाटगल, नितीन चिलवेरी, मलू कोळी, लक्ष्मण पुजारी, कुमार शिसगीकर, नागू कोळी, अफसर नालवार, सिद्धू मंदकल, श्रीकांत दासरी, गोपाळ कुर्ले, सिंधू हळी, प्रवीण डोळे, प्रवीण कैरमकोंडा, बिलाल इनामदार, रमेश पेद्दी, आकाश अवाल, दिनेश पाटील, संतोष कोळी, सिद्धारूढ गंदाळकर, दीपक करली, संतोष करली, प्रकाश पुजारी, प्रकाश साळुंखे, व्यंकटेश डोळे, विनायक डोळे, यशवंत पुराणिक, महेबूब नालवार, मुजाहिद शिरवार, अमर म्हाडा, शिवा हळी, जबना होसमनी, प्रशांत गाडेकर, विनायक गंदाळकर, अप्पू उळागडे, अंपना पाटील, बाळू गुब्याडकर, संतोष जेरकल, चंदू कोळी, जिंदा गजेळी, प्रकाश करली, वीरपक्ष करली, बुद्धेपा पुजारी, रमेश सरवदे, अंबरेश पाटील, कृष्णा पाटील, नानी गुज्जा, अमृत बोड्याल, भिमा पुजारी, सिद्धारूढ मंदकल, अवि पुजारी, आकाश जमादार, गोविंद संगा यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, युवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
