सोलापूर – बुधवारी सायंकाळी सोलापूर च्या शिवाजी चौकातून भाजपाने संवीधान बचाव रॅली काढली. वास्तविक देशात व राज्यात सत्ताधारी भाजपच आहे.
कायदा व सुव्यवस्था ,प्रशासन राबविण्याचे अधिकार त्यांनाच आहेत. आज दुष्काळी स्थिती ने जनता त्रस्त आहे, अशात सत्ताधारी आपली कर्तव्ये विसरून अलिशान गाड्या तून रॅलीत सामील होतात, आज सोलापुरात गाड्यांचा मोठा ताफा दिसला .
वास्तविक भाजपा जाती धर्मात भांडणे लावणे ,पक्षफोडी, वोट चोरी ,मंदिरातील चंदा चोरी , लक्ष विचलीत करणारी विधाने करणे ,सत्तेचा गैरवापर करून विरोधकांना संपविणे , लोकांना लाच देणे असे उद्योग करत आहेत ..आणि पुन्हा तेच लोक रस्त्यावर उतरून लोकतंत्र बिघडल्याची तक्रार करत आहेत.म्हणजे उलटा चोर कोतवाल को ढांटे..अशी अवस्था झाली आहे.
एकंदरीत चोरच वरशिरजोरी करत उलटी बोंब मारत आहे.यावरून सत्ताधारी लोकांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसुन येते.
