सोलापूर – पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी होणाऱ्या आगामी निवडणुकीच्या प्रचारार्थ आ. रोहित पवार हे सोलापूर दौऱ्यावर आले असता आढावा बैठकीत युवकांत विशेष ओळख आणि कार्य असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे युवक प्रदेश सरचिटणीस खलील शेख यांनी त्यांच्या मित्र परिवार सह आमदार रोहित पवार यांचा सत्कार करत शहराध्यक्ष महेश गादेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रोहित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला.
पक्ष प्रवेश वेळी मंचावर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव, जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख, महिला जिल्हाध्यक्षा पल्लवी पाटील, महिला शहराध्यक्षा सुनीता रोटे, शहर जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार, अल्पसंख्यांक प्रदेश सचिव जावेद खैरदि आदी उपस्थित होते. पक्ष प्रवेश वेळी समोर उपस्थित कार्यकर्ते यांनी आमदार रोहित पवार यांचे जल्लोषात घोषणा देत स्वागत केले आणि खलील शेख यांच्या प्रवेशाबद्दल टाळ्या वाजवून स्वागत केले.
खलील शेख यांच्या सोबत त्यांचे कट्टर समर्थक व सहपदाधिकारी तुषार स्वामी, संजय चव्हाण, सचिन गुत्तेदार, प्रेम बनसोडे, अभिजीत पाटील, कशीब बेलीफ, मुबिन शेख, दाऊद शेख, मुशीर दुरुगकर, इम्रान गोलंदाज, साबिर सय्यद, इक्राम दद्दुमिया यांचा देखील पक्षप्रवेश झाल्याचे खलील शेख यांनी सांगितले .
